लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली आपली बस (शहर बस) सुरू करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतु बस सुरू होण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहर बस सुरू करायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना आहेत. परंतु शहरातील कोविड संक्रमण विचारात घेता याबाबतचा निर्णय घेण्याबाबत साशंक आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, महापौर संदीप जोशी काही आमदारांसह बस सेवा सुरू करण्यासंदर्भात येत्या मंगळवारी बैठक घेणार आहेत. यात सकारात्मक निर्णय होण्याची आशा आहे. दुसरीकडे बस बंद असल्याने शहरातील गरीब व मध्यमवर्गींयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.२३ मार्चपासून आपली बसचे संचालन बंद आहे. लॉकडाऊनदरम्यान बस सुरू होण्याची शक्यताही नव्हती. परंतु अनलॉक प्रकिया सुरू होताच मुंबई,पुणे, नाशिक यासह राज्यातील अन्य शहरात शहर बससेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू केली. शासन दिशानिर्देशांचे पालक करीत खासगी बससेवाही सुरू झाली. परंतु शहरातील नागरिकांना अजूनही आपली बस सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे मॉल, उद्योग, कारखाने, बाजार सुरू झाले आहेत. असे असतानाही बसची प्रतीक्षा कायम आहे.
आपली बसची काही दिवस प्रतीक्षाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:08 PM
Apli Bus, Nagpur News मागील साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली आपली बस (शहर बस) सुरू करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतु बस सुरू होण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहर बस सुरू करायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना आहेत.
ठळक मुद्दे लवकरच बैठक : नागरिकांना सकारात्मक निर्णयाची आशा