न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या मुख्यालयात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:06 AM2018-11-02T00:06:00+5:302018-11-02T00:06:56+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचे मुख्यालय प्रशासकीय कारणामुळे मुंबई करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी गुरुवारी निर्णय जारी केला. हा निर्णय गुरुवारपासूनच लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत न्या. धर्माधिकारी यांचे मुख्यालय नागपूर होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचे मुख्यालय प्रशासकीय कारणामुळे मुंबई करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी गुरुवारी निर्णय जारी केला. हा निर्णय गुरुवारपासूनच लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत न्या. धर्माधिकारी यांचे मुख्यालय नागपूर होते.
न्या. धर्माधिकारी यांची १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर, म्हणजे १२ मार्च २००६ रोजी त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले. नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी मिळविल्यानंतर त्यांनी आॅक्टोबर-१९८० पासून वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी १९८४ पर्यंत अॅड. एच. एस. घारे यांच्या हाताखाली कार्य केले. त्यानंतर ते स्वतंत्रपणे कार्य करायला लागले. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी विविध न्यायालयांमध्ये विविध प्रकारची प्रकरणे हाताळली. ते हायकोर्ट बार असोसिएशनचे ग्रंथालय प्रभारी व कोषाध्यक्ष होते. तसेच, त्यांनी ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अतिथी व्याख्याते म्हणूनही सेवा दिली आहे.