नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दामा शेषाद्री नायडू यांनी १३ ऑगस्ट रोजी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला.
न्या. नायडू यांची सुरुवातीला २१ सप्टेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जून-२०१४ मध्ये केरळ उच्च न्यायालयात तर, मार्च-२०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी विविध प्रकरणांवर महत्त्वपूर्ण निर्णय दिले. १९ जून १९६२ रोजीचा जन्म असलेले न्या. नायडू यांनी तिरुपती येथील श्री वेंकटेश्वरा विद्यापीठातून विधी पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांनी न्यायमूर्तीपदी नियुक्ती होतपर्यंत दिवाणी व फौजदारी या दोन्ही प्रकारात उच्च न्यायालय व इतर कनिष्ठ न्यायालयात दीर्घकाळ वकिली केली.