न्या. पुष्पा गणेडीवाला यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 10:48 PM2022-02-10T22:48:57+5:302022-02-10T22:49:26+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला.
न्या. गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलेले दोन निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यावर देशभरात टीका झाली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयांवर लगेच स्थगिती दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. गणेडीवाला यांना सेवेत कायम न करता एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. ती मुदतवाढ या शनिवारी संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये न्या. गणेडीवाला यांचे दोन्ही वादग्रस्त निर्णय अवैध ठरवून रद्द केले. तसेच कॉलेजियमने दुसऱ्यांदा त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला नाही. या परिस्थितीत न्या. गणेडीवाला यांनी राजीनामा दिला आहे.