शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अल्पवयीन गुन्हेगारांची धिंड भोवली : जरीपटका ठाणेदारासह सात जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:25 AM

Juvenile offender procession Case, crime newsतलवार, चाकूच्या धाकावर हैदोस घालून बीअरबार लुटणाऱ्या अल्पवयीन आरोपींची अर्धनग्न धिंड काढणे पोलिसांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणात जरीपटक्याचे ठाणेदार खुशाल तिजारे आणि एपीआय विजय धुमाळ यांच्यासह सात पोलिसांवर बाल न्याय अधिनियमांतर्गत एफआयआर दाखल झाल्याने शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस दलात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तलवार, चाकूच्या धाकावर हैदोस घालून बीअरबार लुटणाऱ्या अल्पवयीन आरोपींची अर्धनग्न धिंड काढणे पोलिसांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणात जरीपटक्याचे ठाणेदार खुशाल तिजारे आणि एपीआय विजय धुमाळ यांच्यासह सात पोलिसांवर बाल न्याय अधिनियमांतर्गत एफआयआर दाखल झाल्याने शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.घटना २२ सप्टेंबरच्या रात्रीची आहे. जरीपटक्यातील एका बीअरबारमध्ये शिरून सहा आरोपींनी तलवार, चाकूच्या धाकावर हैदोस घातला. बार व्यवस्थापक श्रेयस पाटील यांच्यासह दोघांवर तलवार फिरवून बारमधील ७ हजारांची रोकड लुटून नेली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागपुरातील गुन्हेगार कसे निर्ढावलेत, त्याचीही चर्चा सुरू झाली. दुसरीकडे सिनेस्टाईल बार लुटला म्हणून जरीपटका पोलिसांनी रात्रभर आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक करण्यात यश मिळवले. २३ सप्टेंबरला सर्व आरोपींची पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सहापैकी पाच आरोपी अल्पवयीन असल्याचे उघड झाल्याने काही जणांनी हे प्रकरण उचलून धरले. अल्पवयीन आरोपींची अशाप्रकारे धिंड काढणाऱ्या पोलिसांवर हिरोगिरीचा आरोपही झाला. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांना सोपविली. कार्यकर्ते यांनी संबंधित पोलीस, बालगुन्हेगार, त्यांचे नातेवाईक यांचे बयाण नोंदविले. शुक्रवारी तो चौकशी अहवाल सादर करतानाच बाल न्याय अधिनियमानुसार जरीपटक्याचे ठाणेदार तिजारे, सहायक निरीक्षक धुमाळ यांच्यासह सात पोलीस दोषी असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला. त्यावरून या सात जणांवर जरीपटका ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. या घडामोडीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.रिवॉर्डची अपेक्षा, नोकरी धोक्यात!दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांच्या काही तासातच मुसक्या आवळण्याची कामगिरी बजावल्यामुळे संबंधित पोलिसांना रिवॉर्ड मिळण्याची अपेक्षा होती मात्र रिवॉर्ड तर सोडा, या घडामोडीमुळे त्यांची नोकरीच धोक्यात आली आहे.गुन्हेगारांना धडा, नको रे बाबा !शहरात यापूर्वी अशा प्रकारे गुन्हेगारांची धिंड काढण्याचे प्रकार यापूर्वीही घडले.मात्र, यावेळीचे गुन्हेगार अल्पवयीन असल्याने ते पोलिसांच्या अंगलट आले. परिणामी यापुढे अशा प्रकारे गुन्हेगारांना धडा शिकविण्याची हिम्मत आता कोणताही पोलीस दाखवणार नाही, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.गुन्हे शाखा करणार चौकशीया प्रकरणाची चौकशी करणारे सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांच्याकडे या संबंधाने वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यकर्ते यांच्या अहवालात वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे, उपनिरीक्षक विजय धुमाळ, एनपीसी मुकेश यादव, रोशन तिवारी, डागा, लक्ष्मण चौरे, सुशील महाजन यांची दोषी म्हणून नावे असल्याचे समजते. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा करणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे