शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी पराक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:14 AM

ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी घडितो पराक्रम. ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची कथा उलगडण्यात आली आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘ डॉ. भीमराव’ : महापरिनिर्वाण दिनाला महानाट्याद्वारे अभिवादनतिसरा खासदार सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाज्वल्य अभिमान जागवणाऱ्या आणि अस्तित्त्वाला काळिमा फासणाऱ्याही, अशा परस्परविरोधी घटनांनी इतिहास घडतो आणि म्हणूनच काय करावे व काय करू नये, याचे धडे इतिहासातून प्राप्त होतात. इतिहास हा सदैव प्रेरणादायी असतो. फक्त प्रेरणा कोण कशी घेतो, हे ज्याचे त्याचे ठायी. पराक्रम गाजवायला वेदनेची जाणीव होणे आणि त्यासाठी संवेदना जागृत असणे गरजेचे असते. म्हणूनच म्हटले जाते... ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी घडितो पराक्रम. ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची कथा उलगडण्यात आली आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यात आले. 

ईश्वर देशमुख शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी किरण गभणे लिखित व शैलेंद्र बागडे दिग्दर्शित ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्याचे सादरीकरण झाले. दीपप्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, नाना श्यामकुळे, संदीप जाधव, प्रा. केशव भगत, पुरण मेश्राम, भूपेश थुलकर, आमदार नागो गाणार, डॉ. मिलिंद माने, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुभाष पारधी, आ. मोहन मते, नगरसेवक संदीप गवई, धर्मपाल मेश्राम, अभय गोटेकर उपस्थित होते. श्याम देशपांडे यांनी गायलेल्या ‘निर्माणो के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भुले’ हे प्रेरणा गीत सादर झाले.महानाट्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते वाचन, अभ्यास, समाजाकडून त्यांना झालेला त्रास, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य, दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधक्कारमय जीवनाला नवी ऊर्जा देणाऱ्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सुधीर पाटील यांनी, त्यांचे वडील रामजी यांची भूमिका मिलिंद रामटेके यांनी साकारली. अशोक गवळी, माया मंडले, बशीर खान, अशोक वचनेकर, सम्राट गोटेकर, महेश कसलीकर आदींच्या यात भूमिका होत्या. प्रकाश योजना मंगेश विजयकर, संगीत भूपेश सवाई यांची तर मेकअप नकुल श्रीवास यांचे होते.गडकरींचे कामच मोठे - चंद्रकांत पाटीलकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कामच मोठे असून, ते कायम भव्यदिव्य विचार करतात आणि ते वास्तवात उतरवूनही दाखवतात. या १७ दिवसाच्या महोत्सवरून ते सिद्ध होते. गडकरी हे ३० दिवसाचा महोत्सवही करू शकतात. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांसारखे नेते लाभले हे नागपूरकरांचे भाग्य असल्याची भावना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcultureसांस्कृतिक