शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

नागपुरातील कळमना मार्केट १८ पासून बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 9:53 PM

कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये (कळमना बाजार) दीड वर्षांपासून असलेल्या प्रशासकाच्या कारभारामुळे सातही बाजाराची दुर्दशा झाल्याचा आरोप संबंधित बाजाराच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला. शनिवारी प्रशासकासोबत झालेल्या बैठकीत सर्व बाबींवर तोडगा काढण्यात त्यांना अपयश आले.

ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य, चोरांचा हैदोस, रस्त्यावर खड्डेबैठकीत प्रशासकाला तोडगा काढण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये (कळमना बाजार) दीड वर्षांपासून असलेल्या प्रशासकाच्या कारभारामुळे सातही बाजाराची दुर्दशा झाल्याचा आरोप संबंधित बाजाराच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला. शनिवारी प्रशासकासोबत झालेल्या बैठकीत सर्व बाबींवर तोडगा काढण्यात त्यांना अपयश आले.बाजाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हकळमना बाजारात दुर्दशा असल्यामुळे फळ बाजार १८ आणि १९ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. फळ बाजाराचे पदाधिकारी म्हणाले, फळ बाजारात घाणीचे साम्राज्य असून चोरांनी हैदोस मांडला आहे. बाजार समितीचे गार्ड त्यांच्यावर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरले आहेत. दुकानाचे कुलूप तोडून चोरी करीत आहे. दुकानांच्या खिडक्यांमधून चोर लहान मुलांना आत पाठवून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. चालत्या ट्रकमधून फळांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. आॅक्शन हॉलमध्ये उरलेल्या मालाची चोरी ही नित्याचीच बाब आहे. गार्डला तलवारीचा धाक दाखविला जात आहे. रात्री चोरांची संख्या जास्त असल्यामुळे जीवाच्या भीतीने गार्डने चुप्पी साधली आहे. त्या कारणामुळे अनेक रात्रकालीन गार्डने नोकरी सोडली आहे. चोरीच्या तक्रारी कळमना पोलीस ठाण्यात नोंदविली असता पोलीस एफआयआरची कॉपी देण्यास नकार देत आहेत. ही बाब प्रशासकाला सांगितली असता, त्यांनी या बाबतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बाजाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चोरीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटकाचोरीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांना मालाची १० ते २० टक्के रक्कम कमी मिळत आहे. चोरीच्या भीतीने शेतकऱ्यांना मालाजवळ रात्रभर बसून राहावे लागत आहे. त्यांनी माल विकावा की राखण करावी, असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.मुख्य द्वारासमोरील रस्त्याचे बांधकाम बंदकळमना बाजार समितीच्या मुख्य द्वारासमोरील रस्त्याचे बांधकाम तीन वर्षांपासून सुरू आहे. तसे तर हे बांधकाम सहा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. पण राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांवर वचक नसल्यामुळे बांधकाम केव्हा पूर्ण होईल, हे सांगणे कठीण आहे.बाजारात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्यबाजार समितीच्या आवारात संपूर्ण रस्ता पावसामुळे उखडला आहे. मालाचे ट्रक या रस्त्यांवरून जातात तेव्हा केव्हा उलटेल, याचा नेम नसतो. गेल्या दीड वर्षांत रस्त्यांची डागडुजी झालेली नाही, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. प्रशासक नायक यांच्यापूर्वी दोन प्रशासकांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.घाणीमुळे आजाराला आमंत्रणबाजारात दररोज कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे या परिसरात येणारे शेतकरी आणि व्यापाºयांना विविध रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. साफसफाईचे कंत्राटदार आपली जबाबदारी पार पाडत नसल्यामुळे रस्त्यावरील घाण ही नेहमीचीच बाब झाली आहे.कोट्यवधींच्या सेसची वसुलीकळमना बाजारात शेकडा १.०५ रुपये दराने सेस वसुली केला जातो. सेसच्या स्वरुपात वसूल केलेले जवळपास १५० कोटी रुपये समितीकडे जमा आहेत. पण दैनंदिन स्वच्छता आणि रस्त्यांच्या डागडुजीचे काम करण्यास समिती अपयशी ठरली आहे. प्रशासकाच्या निर्णयाविना कोणतीही कामे होत नसल्यामुळे कळमना बाजार बेवारस झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना केला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnagpurनागपूर