लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठीसांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.१९९६ पासून सातत्याने कालिदास महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो. या महोत्सवाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने तत्कालीन विभागीय आयुक्तांनी सन २०१५ मध्ये कालिदास समारोह समिती स्थापन करून कालिदास समारोह आयोजन समिती आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा महोत्सव केला. तेव्हापासून तो सलग सुरु आहे. गेल्यावर्षी ‘ऋतुसंहार’ या रचनेवर आधारित सहा ऋतूंच्या सौंदर्यावर महोत्सव पार पडला. यावर्षीचा समारोह हा ‘शकुंतला: भारतीय स्त्रीचे सूर’ या विषयावर आधारित राहणार असून तबला क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुराधा पाल, विदुषी आरती अंकलीकर (गायिका) पद्मश्री देवयानी (भरतनाट्यम), कौशिकी चक्रवर्ती (गायिका), संगीता शंकर (व्हायोलीन) आणि बेगम परवीन सुलताना (गायन) या यंदाचे विशेष आकर्षण असतील, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात स्थानिक कलावंतांनाही संधी देण्यात आली असून माडखोलकर आणि त्यांचा ग्रुपद्वारे सादर करण्यात येणाऱ्या मंगलचरणाने या महोत्सवला सुरुवात होईल. यावेळी मनपा आयुक्त रवींद्र ठाकरे, महसूल उपायुक्त, सुधाकर तेलंग, अतिरिक्त उपायुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.दुसरा टप्पा जानेवारीमध्ये