लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या कालिदास महोत्सवाचे आयोजन येत्या २७, २८ व २९ नोव्हेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. परंपरेचा नवा आविष्कार ठरलेल्या या महोत्सवात मातब्बर अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांद्वारे भारतीय संगीत परंपरेतील शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी नागपूरकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.समृद्ध अशा विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाकडे लक्षवेध करणे व पूर्व विदर्भ आणि नागपूर शहर राष्ट्रीय स्तरावर प्रमुख सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून स्थापित व्हावे, या उद्देशाने कालिदास महोत्सव आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सौजन्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा महोत्सव ‘शकुंतला-भारतीय स्त्रीचे सूर’ या कवि कालिदास यांच्या कालजयी ग्रंथांचा आधार घेऊन करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये २७ नोव्हेंबर रोजी अनुराधा पाल यांचे ताल वाद्य वृंद तसेच ख्यातकीर्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांचे शास्त्रीय गायन होईल. २८ नोव्हेंबर रोजी पद्मश्री देवयानी यांचे भरतनाट्यम् नृत्य व कौशिकी चक्रवर्ती या कौशिकी आणि सखी या लोकप्रिय कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. समारोपाच्या दिवशी संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन तर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन आयोजित करण्यात आले आहे. कानामनाला तृप्त करणारी सांस्कृतिक मेजवानीच रसिकांना या माध्यमातून मिळणार आहे.
कालिदास महोत्सवातून होणार ‘परंपरेचा आविष्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:18 AM
उपराजधानीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या कालिदास महोत्सवाचे आयोजन येत्या २७, २८ व २९ नोव्हेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. परंपरेचा नवा आविष्कार ठरलेल्या या महोत्सवात मातब्बर अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांद्वारे भारतीय संगीत परंपरेतील शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी नागपूरकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.
ठळक मुद्देनागपूरच्या भट सभागृहात २७ पासून सोहळा : शास्त्रीय गायन, वादन, नृत्याची मेजवानी