हिंगणा तालुक्यात काेराेनाचे ४८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात वानाडोंगरी शहरातील १३ रुग्ण असून, डिगडोह येथील सात, टाकळघाट व हिंगणा येथील प्रत्येकी पाच, नीलडोह येथील चार, भान्सुली व गोंडवाना येथील प्रत्येकी तीन, रायपूर येथील दाेन, वडधामना, सुकळी (बेलदार), कान्होलीबारा, देवळी (काळबांडे), मांडवघोराड, खैरी (पन्नासे) व इसासनी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णांची संख्या ११,०४४ झाली आहे. यातील ८,९०९ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, २३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
काटाेल तालुक्यातील संक्रमण कमी हाेत असल्याचे दिसून येते. तालुक्यात रविवारी ३३ रुग्णांची नाेंद करण्यात आली. विशेष म्हणजे तालुक्यात एकूण २०२ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, त्यातील ३३ जण काेराेना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. या ३३ रुग्णांमध्ये १० रुग्ण काटाेल शहरातील असून, २३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यात कचारीसावंगा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील आठ, कोंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील चार तर येनवा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील ११ रुग्ण आहेत.
रामटेक तालुक्यात २३ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात रामटेक शहरातील तीन तर ग्रामीण भागातील २० रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आजवर ६,३३० काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ४,८२९ रुग्ण काेराेना मुक्त झाले आहेत तर १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १,५०१ असल्याची माहिती महसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. नेतन नाईकवार यांनी दिली.