लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : खाणीच्या आवारातून काेळसा चाेरून नेणारा ट्रक पकडण्यात पाेलिसांना यश आले. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २० टन काेळसा व ट्रक असा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडेगाव परिसरात साेमवारी (दि. १७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये ट्रकचालक मुकेशकुमार मेवाड (वय ३७, रा. शाजापूर, मध्यप्रदेश) व उमेश पानतावणे (४६, रा. कांद्री, ता. पारशिवनी) या दाेघांचा समावेश आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान यांचे पथक साेमवारी दुपारी गाेंडेगाव-घाटराेहणा परिसरात गस्तीवर हाेते. त्यातच त्यांना वेकाेलीच्या गाेंडेगाव खाण परिसरातून एमपी-०९/एचएच-६५२१ क्रमांकाचा ट्रक जाताना दिसला. संशय आल्याने त्यांनी तो थांबवून त्याची झडती घेतली.
त्या ट्रकमध्ये काेळसा आढळून येताच त्यांची कागदपत्रांची तपासणी केली. ट्रकचालकाकडे काेळसा वाहतुकीची बिल्टी अथवा वेकाेलीचा गेटपास यांपैकी काहीही नव्हते. ताे काेळसा चाेरीचा असल्याचे स्पष्ट हाेताच ट्रकमधील दाेघांना ताब्यात घेत त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून आठ लाख रुपयांचा ट्रक आणि एक लाख रुपये किमतीचा २० टन काेळसा असा एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. या प्रकरणी पाेलीस शिपाई विक्की काेथरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत कदम, येशू जोसेफ, कुणाल पारधी, राजेंद्र गौतम, राहुल रंगारी, संदीप गेडाम, संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशील तट्टे यांच्या पथकाने केली.