आॅनलाईन लोकमत
नागपूर: शहरातील नेत्रहीन जलतरणपटू कांचनमाला पांडे (देशमुख) हिने मेक्सिको शहरात सुरू असलेल्या विश्व पॅरा जलतरण स्पर्धेत आपल्या गटात सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या एस-११ प्रकारात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.तिचे कोच प्रवीण लामखाडे यांनी येथे दिलेल्या माहितीनुसार कांचनमालाने २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णमय कामगिरी केली.३:५६.०३ सेकंद अशी वेळ तिने नोंदविली. या वर्षी जुलैमध्ये बर्लिन येथे झालेल्या आयडीएम बर्लिन पॅरा जलतरण स्पर्धेत कांचनमालाने रौप्यपदक जिंकले होते.सध्याच्या स्पर्धेत कांचनमालाने शंभर मीटर फ्री स्टाईल, शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदविली तर फ्री स्टाईल प्रकारात चौथ्या आणि बॅक स्ट्रोक व ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात पाचव्या स्थानी राहिली.मूळची अमरावतीची ही खेळाडू राष्टÑीय पॅरा जलतरण स्पर्धेत अनेक पदकांची मानकरी असून विश्व, आशियाड आणि राष्टÑकुल अशा विविध स्पर्धेत तिने आठवेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत ती कार्यरत आहे. अॅक्वा स्पोर्टस् क्लब येथे सराव करणाºया कांचनमालाच्या खेळातील यशामागे पती विनोद देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे.