प्रमाेद गजभिये १९९६ मध्ये एसआरपी ग्रुप-४ मध्ये सिपाही म्हणून रुजू झाले हाेते. एप्रिल २०१५ मध्ये पाेलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली. नुकतीच त्यांची एसआयडीमध्ये राउडर म्हणून नियुक्ती झाली हाेती. २९ एप्रिल राेजी त्यांना काेराेनाची लागण झाली. ऑक्सिजनचा स्तर कमी असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. स्थिती आणखी बिघडल्याने १८ मे राेजी त्यांना धंताेली येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. धक्कादायक म्हणजे पत्नी सुकेशिनी यांचा सहा दिवसांपूर्वीच १३ मे राेजी काेराेनामुळे मृत्यु झाला हाेता. त्या वर्धा येथे राेजगार हमी विभागात सेवारत हाेत्या. गजभिये दांपत्याला १४ वर्षाची नियती व १० वर्षाची वंचिता अशा दाेन मुली आहेत. आईवडिलांच्या निधनाने त्यांच्यावर संकटाचे आभार काेसळले आहे. त्यांच्या निधनाने पाेलीस विभागात शाेककळा पसरली आहे.
काेराेनाने घेतला गजभिये दांपत्याचा बळी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:09 AM