शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सावनेर तालुक्यात काेराेनाचे ‘त्रिशतक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:10 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/कळमेश्वर/उमरेड/काटाेल/हिंगणा/कन्हान/रामटेक/कुही/माैदा/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी (दि. ३०) सावनेर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर/कळमेश्वर/उमरेड/काटाेल/हिंगणा/कन्हान/रामटेक/कुही/माैदा/नरखेड :

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी (दि. ३०) सावनेर तालुक्याने काेराेना रुग्णांचे त्रिशतक पूर्ण केले असून, कळमेश्वर व उमरेड तालुक्यांनी शंभरी गाठली, तर काटाेल तालुक्याने शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

सावनेर तालुक्यात ३२८ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, त्याखालाेखाल कळमेश्वर तालुक्यात १६१, उमरेड तालुक्यात ११६, काटाेल तालुक्यात ९५, हिंगणा तालुक्यात ७६, कन्हान (ता. पारशिवनी) येथे ६६, रामटेक तालुक्यात ४८, कुही तालुक्यात ३३, माैदा तालुक्यात २८, तर नरखेड तालुक्यात १९ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली.

सावनेर तालुक्यातील ३२८ रुग्णांमध्ये ९० रुग्ण सावनेर शहरातील असून, २३८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यात बडेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गावांमधील २८, खापा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गावांमधील २९, केळवद प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गावांमधील १२, पाटणसावंगी प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गावांमधील ९१, तर चिचाेली (खापरखेडा) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत गावांमधील ७८ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सावनेर तालुक्यात मंगळवारी एकूण १,०९६ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली हाेती.

कळमेश्वर तालुक्यात १६१ रुग्ण आढळून आले. यात कळमेश्वर-ब्राम्हणी शहरातील ३७, तर ग्रामीण भागातील १२४ रुग्ण आहेत. तालुक्यातील धुरखेडा येथे १९, वाढोणा (बु) येथे १५, सावळी (बु) येथे १२, धापेवाडा येथे ११, सुसंद्री येथे ९, सोनपूर येथे ८, बोरगाव (खुर्द), वरोडा व मोहपा येथे प्रत्येकी ५, भडांगी येथे ४, गोंडखैरी, उबाळी व लोणारा येथे प्रत्येकी ३, चौदामैल, सेलू व तिष्टी येथे प्रत्येकी २, तर आष्टी (कला), आदासा, खैरी (लखमा), खानगाव, तिष्टी, खैरी (हरजी), निमजी, उपरवाही, मांडवी, कोहळी, पारडी (देशमुख), पिपळा, परसोडी, वाढोणा, तिडंगी व तेलकामठी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

उमरेड तालुक्यातही ११६ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. ही दुसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या हाेय. यात शहरातील ७०, तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. या नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण काेराेना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या १,८५५ झाली आहे. यात शहरातील १,०६३ आणि ग्रामीण भागातील ७९२ रुग्ण आहेत.

दुसरीकडे, काेराेनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही समाधानकारक आहे. शहरातील ८०५ आणि ग्रामीण भागातील ५६२ असे एकूण १,३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ४३६ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, यात २२५ रुग्ण शहरातील व २११ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

काटाेल तालुक्यानेही शतकाकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. तालुक्यात मंगळवारी ९५ नवीन रुग्ण आढळून आले असून, यातील ३५ रुग्ण शहरातील, तर ६० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. काटोल शहरातील ३५ रुग्णांमध्ये पंचवटी येथील नऊ, जानकीनगर येथील सात, पुरुषोत्तम मंदिर परिसर, लक्ष्मीनगर, कडू लेआऊट, धंतोली, सरस्वतीनगर येथील प्रत्येकी दोन, तर मरामायनगर, घोडेप्लॉट, आययुडीपी, काळेचौक, राऊतपुरा, सावरगाव रोड, शनिचौक, गळपुरा, शारदा चौक येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील कोंढाळी येथील ११, लिंगा येथील नऊ, लाडगाव येथील आठ, मसाळा येथील सात, कलंभा येथील सहा, मुकनी येथील चार, कुकडीपांजरा व रिधोरा येथील प्रत्येकी दोन आणि पारडी (गोतमारे), मसली, दिग्रस, तपनी, कोहळा, वंडली, घरतवाडा, दुधाळा, पारडसिंगा, चिचाळा व मोहखेडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात मंगळवारी ७६ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. या नवीन रुग्णांमध्ये वानाडोंगरी शहरातील २१, हिंगणा शहरातील १५, डिगडोह येथील १२, इसासनी, रायपूर व मोहगाव येथील प्रत्येकी ४, मांडव-घोराड येथील ३, सुकळी, डेगमा (खुर्द) व वागदरा येथील प्रत्येकी २, नागलवाडी, गुमगाव, नीलडोह, मेटाउमरी, कान्होलीबारा, टाकळघाट व मोंढा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५,७२६ झाली असून, यातील ४,९०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय, १२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तालुक्यात मंगळवारी ठिकठिकाणी ५६० नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या हाेत्या.