शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कारगीलमुळे देशाचा खरा अर्थ समजला

By admin | Published: July 26, 2016 2:36 AM

उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही....

रणधुमाळीत सत्याचाच विजय : प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी दाखविली जिगरआज कागरिल विजय दिवसनागपूर : उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही. अशा स्थितीत आमच्यासोबत होते ते घरच्यांसोबतच कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद. त्यांच्या आशांना पूर्ण करण्याची आमच्यावर जबाबदारी होती आणि आमच्या विश्वासाला साथ मिळाली ती बलशाली अशा बोफोर्स तोफांची. ज्यावेळी टायगर हिलवर तिरंगा फडकला तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा खरा अर्थ समजला. या भावना आहेत कारगीलच्या युद्धात लढलेल्या व सध्या नागपुरात कार्यरत असलेल्या एका जिगरबाज जवानाच्या. संबंधित जवानाने नाव न छापण्याच्या अटीवरच आपल्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. सुरुवातीला कारगील व द्रास येथे नेमके काय होत आहे याचा अंदाजच आला नाही. ज्यावेळी खरी परिस्थिती समोर आली तेव्हा खूप उशीर झाला होता. मृत्यू गोळी किंवा बॉम्बगोळ्याच्या रूपात कुठून येईल याचा कुठलाही भरवसा नव्हता. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे हातपायदेखील गारठत होते. सर्वच बाबी प्रतिकूल होत्या. परंतु तरीदेखील भारतीय जवानांचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. प्राण पणाला लावून सैनिक वर चढण्याचा प्रयत्न करत होते. कपडे, पाणी, अन्न यांची सुरुवातीला कमतरता जाणवली. परंतु या परिस्थितीत सैनिकांना सर्वात जास्त आधार वाटला तो तोफगोळा पथक व बोफोर्स तोफांचा. या पथकामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जवानांचा विजय साकार केला. ज्या वेळी युद्धात भारताचा विजय झाला तेव्हा मनातील भावना व्यक्त होत नव्हत्या. मनाला समाधान होते देशाची सेवा केल्याचे, परंतु दु:ख होते एकाहून एक जिगरबाज जवान व अधिकारी गमाविल्याचे. आज कारगील युद्धाला वर्ष झाले. परंतु प्रत्येक क्षण मनात ताजा आहे, असे सांगत असताना जवानाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते. (प्रतिनिधी)डोळ्यातील अश्रू हिंमत द्यायचेआमच्या समोर अनेक भारतीय जवान शहीद झाले. तर अनेक जण जखमीदेखील झाले. जखमी सैनिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचेदेखील मोठे आव्हान होते. परंतु हे आव्हानदेखील प्राणांची पर्वा न करता जवानांनी पार पाडले. शहीद जवानांना पाहून काही क्षणांसाठी डोळ्यात अश्रू यायचे. परंतु यामुळे शत्रूला सडेतोड उत्तर देण्याचे बळ मिळायचे, असे या शूरवीराने सांगितले.