शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
5
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
6
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Nagpur: कर्नाटकात हनुमानाने भाजपवर गदा फिरवली, शहर काँग्रेसचा देवडिया भवनासमोर जल्लोष

By कमलेश वानखेडे | Published: May 13, 2023 5:45 PM

Nagpur: कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे.

- कमलेश वानखेडे

नागपूर : कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. देशातील जनता भाजपला कंटाळली आहे, हे या निकालावरून स्पष्ट झाले, असे मत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.

देवडिया काँग्रेस भवनात शनिवारी शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ढोल-ताशांच्या निनादात मिठाई वाटून कर्नाटकच्या विजयाचा आंनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात झालेल्या या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. अभिजित वंजारी, बंटी शेळके, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, गजराज हटेवार, रमन पैगवार, प्रशांत धवड, दिनेश बानाबाकोडे, वसिम खान, गुड्डू अग्रवाल, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.

यावेळी विलास मुत्तेमवार म्हणाले, कर्नाटकात कोणत्याही कामात ४० टक्के कमीशन घेण्यामुळे भाजप बदनाम जाली आहे. हिंदु मुस्लिम हा विषय लोकांनी नाकारला. हा धर्मिनरपेक्ष देश आहे. भाजपच्या धार्मिक विखारी प्रचाराला बळी न पडता लोकांना सावध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. अभिजंत वंजारी यांनी कर्नाटकात कुलगुरू बनविण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचे सांगत भ्रष्टाचाराची सीमा ओलांडल्याचे सांगितले.

कोराडी वीज प्रकल्पाच्या विस्तारास विरोध- कोराडी वीज प्रकल्पात पुन्हा ११२ मेगावॅटचे विस्तारित संच उभारण्यात येत आले. याला पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. काँग्रेसने या प्रकल्पात लक्ष देऊन जनहितासाठी विरोध करावा, असा ठराव विशाल मुत्तेमवार यांनी बैठकीत माडला व तो संमत करण्यात आला.

‘हाथ से हाथ जोडो’ निरीक्षकांवर नाराजी- ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान यशस्वी करण्यासाठी ब्लॉक स्तरावर निरीक्षक नेमले होते. या अभियानाच्या अंमलबजावणीचा वास्तिवक अहवाल बहुतांश निरीक्षकांनी शहर काँग्रेसकडे अद्याप सादर केलेला नाही. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली व आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

जनसमस्या समित्यांच्या प्रभाग अध्यक्ष नेमणारनागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचा महापालिका, नासुप्र व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी प्रभाग निहाय जनसमस्या निवारण समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. यासाठी २० मे नंर प्रत्येक प्रभागाची बैठक घेतली जाईल व या समित्यांसाठी प्रभागनिहाय अध्यक्ष नेमले जातील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकnagpurनागपूरcongressकाँग्रेस