नागपूर : करवंद हे वार्षिक रानटी पीक असून, अत्यंत कमी खर्च, जपणूक व बहुउपयोगी असून, भरघोस नफा देणारे पीक असल्याची माहिती विश्लेषणासह उच्चशिक्षित युवा शेतकरी आशिष जाधव यांनी दिली.
ग्रामायण प्रतिष्ठानच्या कृषिगाथा या नियमित सदरात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. करवंद या पिकावर पाणी, जमीन, वातावरण किंवा नैसर्गिक आपत्तीचा दुष्परिणाम होत नाही. दुष्परिणाम झालाच तर तो अंशत: असेल. विशेष म्हणजे हे पीक पर्यायी व संरक्षक कुंपणासारखी लागवड करता येणारे आहे. शिवाय, कुठलीही अतिरिक्त काळजी घ्यावी लागत नाही. हिरवे व गुलाबी करवंद अशा पर्यायात हे पीक घेता येते. याद्वारे चेरी, वाईन, मुरब्बा आदी तयार केले जाते, असे जाधव यावेळी म्हणाले. प्रास्ताविक किशोर केळापुरे यांनी केले. सुमित माईनकर यांनी जाधव यांची मुलाखत घेतली.
............