काटाेल : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात रक्तदात्यांची मोठी साखळी तयार होत आहे. याअंतर्गत सहभागी होत रविवारी काटोलकरांनी रक्ताचं ‘नातं’ जपत मोहिमेला अधिक बळ देण्याचे काम केले. सक्षम फाऊंडेशन व उड्डाण फाऊंडेशन काटाेल यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद शाळा क्र. २ येथे आयाेजित रक्तदान शिबिरात शहरातील सेवाभावी संघटना, पाेलीस कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांनी शिबिराचे उद्घाटन केले. काेराेनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून लाेकमतच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक याप्रसंगी ठाकूर यांनी केले. या उपक्रमाला बळ देण्याचे काम काटोल शहरातील प्रत्येक संघटनेने करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, तहसीलदार अजय चरडे, माजी जि. प. सदस्य चंद्रशेखर काेल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, संचालक अजय लाडसे, नगरसेविका शालिनी महाजन, लता कडू, वनिता रेवतकर, शालिनी बन्साेड, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे रुपेश नाखले, नितीन वानखेडे उपस्थित हाेते. तहसीलदार चरडे यांच्या पत्नी प्रिया यांनी प्रथम रक्तदान करीत शिबिराला सुरुवात केली. या शिबिराला जाेतिबा फुले अभ्यासिका, पाेलीस ठाणे, एसटी महामंडळ कर्मचारी संघटना, युवा सेना, शिक्षक व कर्मचारी संघटना, काटाेल कंत्राटदार संघटना, जाणता राजा प्रतिष्ठान, हॅपी टू केअर व सामाजिक संघटना आदींनी सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते राजू ठाकूर, माजी जि.प. सदस्य समीर उमप, माजी पं. स. सभापती संदीप सरोदे, नगरसेवक तानाजी थोटे, पं.स सदस्य संजय डांगोरे, कंत्राटदार कावडकर, शिवसेनेचे पदाधिकारी विपुल देवपुजारी, तिलक क्षीरसागर, लखन राऊत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी शिबिरस्थळी भेट देत रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लाेकमतचे तालुका प्रतिनिधी सौरभ ढोरे, शहर प्रतिनिधी अमोल काळे, उड्डाण फाउंडेशनचे शुभम ढोरे, अभिषेक चांडक, हॅपी टू केअरचे मयूर काळे, राहुल काळे, साहिल ढेरकर, लोचन राऊत, राहुल भोयर, श्रेयस ढोंगे, प्रफुल सातपुते, स्वप्निल बरडे, निशांत उमाठे, नकुल गुजर, भूषण गायकवाड आदींनी सहकार्य केले.
.....
शिक्षक टेकाडे यांचे ३८ वे रक्तदान
काटोल तालुक्यातील शिक्षक राजेंद्र टेकाडे यांनी ३८ व्या रक्तदान करीत लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदानांसाठी युवकांनी पुढे येण्याची आवाहन त्यांनी केले.
.....
पोलीसदादांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य
काटोल पोलिसांच्यावतीने सहायक ठाणेदार राहुल बोंद्रे , पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांच्यासह इतर पोलीस बांधवानी रक्तदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.