सतर्क नागरिकाने दिली पोलिसांना सूचना : अधिकारी कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणानागपूर : बेसा रोडवरील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी, कर्मचारी बँक बंद न करताच घरी परतल्याने चांगलीच खळबळ उडाली. एका जागरूक नागरिकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे व पोलिसांचे वेळेवर मिळालेल्या सहकार्यामुळे अनुचित घटना होण्यापासून टळली. मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या मॅनेजरने बँकेची चाबी चपराशाला दिली होती. चपराशीच बँकेला कुलूप लावत असे. गुरुवारी रात्री बँकेतील लाईट बंद होते. शटरला कुलूप न लावता कर्मचारी निघून गेल्याने बॅँक सुरू होती. रात्री ११ वाजताच्या सुमारास परिसरातील एक व्यक्ती बँकेसमोरून जात होती. एवढ्या रात्री बँकेचे दरवाजे उघडे असल्यामुळे त्याला संशय आला.त्याने लगेच हुडकेश्वर पोलिसांना सूचना केली. रात्री १२ वाजता पोलिसही बँकेत पोहचली. त्यावेळी बँकेत कुणीही नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी ताबडतोब बँकेचे मॅनेजवर व अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यामुळे लगेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी बँकेत पोहचले. दरम्यान पोलिसांनी बँकेची तपासणी केली. सर्व व्यवस्थित होते. यावेळी पोलिसांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलाच दम दिला. (प्रतिनिधी)
बँक उघडी ठेवून कर्मचारी घरी
By admin | Published: June 20, 2015 2:48 AM