शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
2
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
3
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
4
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
5
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
6
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
7
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
8
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
9
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
10
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
11
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
12
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
13
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
14
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
15
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
16
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
17
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
18
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
19
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
20
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार

निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान

By योगेश पांडे | Published: September 24, 2024 7:47 PM

Amit Shah : नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते.

नागपूर : 'पार्टी विथ अ डिफरन्स' अशी प्रतिमा असलेल्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात येऊन पक्षातील गटबाजीवरून पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राजकारणात काम करत असताना अनेकदा मतभेद होत असतात. तर विविध कारणांमुळे अनेकांना उमेदवारी मिळत नाही. त्यातून गटबाजी निर्माण होते. मात्र निवडणूक काळात पक्षात अशी गटबाजी खपवून घेणार नाही. सर्वांनी अंतर्गत मतभेद बाजुला सारून एकत्रित निवडणूकीचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले. विशेष म्हणजे उपस्थित हजारो पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी ही बाब वदवून घेतली. नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते.

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, रणधीर सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

एका तिकीटासाठी अनेक दावेदार असतात. मात्र सर्वेक्षण, जातीय समीकरणे इत्यादी बाबी पाहून उमेदवारी निश्चित करावी लागते. जर तिकीट मिळाले नाही तर त्यावरून कुणीही असंतुष्ट होऊन त्यावर गोंधळ घालत आहे असे प्रकार विदर्भात दिसायला नको, असे परखड मत अमित शाह यांनी व्यक्त केले. सर्वांनी कटुता दूर सारून महायुतीसाठी मैदानात उतरले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा धनुष्यबाण व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळीच्या उमेदवारांचा कमळाप्रमाणेच पूर्ण ताकदीने प्रचार झाला पाहिजे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

विदर्भात महायुतीला ४५ जागा हव्यातभाजपचे महाराष्ट्रातील नेते विदर्भात महायुतीला ४० ते ४२ जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र जर महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर विदर्भात कमीत कमी ४५ जागांवर विजय आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करायला हवे, असे निर्देश अमित अमित शाह यांनी दिले.

महाविकास आघाडीला बुथपातळीवर कमकुवत करायावेळी अमित शहा यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बुथपातळीवर जाऊन काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे बुथपातळीवरील कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना बुथपातळीवर कमकुवत करण्यावर भर द्या, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

वक्फ संशोधन बिल पुढील अधिवेशनात पास होणारदेशभरात वक्फ संशोधन बिलावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची माहिती दिली. हे बिल संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnagpurनागपूरBJPभाजपा