लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षलवाद आता घनदाट जंगलातून सिमेंटच्या शहरात हातपाय पसरू पाहत आहे. फ्रंटल संघटनांच्या माध्यमातून शहरात येऊ पाहणाºया नक्षलवादाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने दक्ष रहावे, असे सूचनावजा निर्देश नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिले.राज्याच्या नक्षल विरोधी अभियानातर्फे नागपूरच्या सुराबर्डी येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रात शनिवारी शहरी नक्षलवाद या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यभरातून उपस्थित झालेल्या अधिकारी-कर्मचाºयांना शेलार यांनी मार्गदर्शन केले. नक्षल विचारसरणी आता माओवादी विचारसरणी झाली आहे. माओवाद्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नाही. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करून त्या माध्यमातून आपल्या देशाचे तुकडे करण्याची त्यांची रणनीती आहे. त्यामुळे जंगलातील माओवाद शहरात पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. फ्रंटल आॅर्गनायझेशनच्या माध्यमातून पद्धतशीरपणे ते केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी सतर्क राहून माओवादाला रोखण्याची गरज आहे. आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करतो. माओवादाच्या समस्येलाही त्याच पध्दतीने हाताळण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरात पसरलेल्या नक्षल समर्थकांवर सूक्ष्म नजर ठेवा, असे निर्देश या कार्यशाळेत शेलार यांनी दिले. कार्यशाळेत राज्यातील ठिकठिकाणच्या नक्षल विरोधी सेल व विशेष शाखेच्या अधिकारी कर्मचाºयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांच्याशी संवाद साधला.नक्षल सेलमध्ये काम करतांना येणाºया अडचणी, समस्या त्यांनी यावेळी मांडल्या. मंचावर नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस उपअधीक्षक संजीव म्हैसेकर प्रामुख्याने उपस्थित होते.भावी पिढीला सावध कराजिल्ह्याजिल्ह्यातील नक्षल सेलमधील अधिकारी-कर्मचाºयांनी आपल्या वरिष्ठांशी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील एएनओसोबत समन्वय साधून कार्य करण्याचे आवाहन यावेळी अधिकाºयांनी केले. त्याचप्रमाणे माओवाद्यांपासून भावी पिढीला सावध करण्याची गरजही या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आली.
नक्षल्यांच्या फ्रंटल संघटनांवर लक्ष ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:47 AM
नक्षलवाद आता घनदाट जंगलातून सिमेंटच्या शहरात हातपाय पसरू पाहत आहे. फ्रंटल संघटनांच्या माध्यमातून शहरात येऊ पाहणाºया नक्षलवादाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने दक्ष रहावे,
ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षक शेलारांचे निर्देश : नक्षल विरोधी सेलची राज्यस्तरीय कार्यशाळा