काटाेल : रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे उत्पादकता कमी हाेत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्या शेतातील मातीचे आराेग्य निकाेप राहण्यासाठी सजग राहून प्रयत्न करावे, असे आवाहन प्रादेशिक फळ संशाेधन केंद्र, वंडली, ता. काटाेल येथील कीटकशास्त्रज्ञ प्रा. डाॅ. प्रदीप दवणे यांनी जागतिक मृदा दिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीने काटाेल तालुक्यातील रिधाेरा व हातला येथे आयाेजित शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत केले.
आपण जर जैवविविधतेचे संरक्षण केले नाही तर त्याचे दुष्पपरिणाम पुढच्या पिढीला भाेगावे लागतील, असेही डाॅ. प्रदीप दवणे यांनी सांगत शेतकऱ्यांना मातीचे आराेग्य कायम राखण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांबाबत विस्तृत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी शेतजमिनीतील मूलद्रव्यांची माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
रिधाेरा येथील कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य संजय डांगाेरे, जयंत टालाटुले, नलिनी राऊत, कृषी पर्यवेक्षक लाेखंडे, कृषी सहायक क्षीरसागर, वैभव राऊत तर हातला येथील कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी संदीप ढाेणे, कृषी पर्यवेक्षक सुधाकर लाेखंडे, नीलेश बाेंद्रे, राेशन चाैधरी यांच्यासह स्थानिक व परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.
---
मृदा जिवंत ठेवा - मंजुषा राऊत
कामठी तालुक्यातील पळसाड (केम) येथेही कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. त्यात तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांनी जैवविविधतेचे रक्षण करीत मृद्रा (माती) जिवंत ठेवण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता, पिकांवरील कीड व राेग, रासायनिक खते, कीटकनाशके व पाण्याचा वापर यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी गेंदलाल अटाळकर, सुरेश झाडे, संताेष मानवटकर, शंकर ठाकरे, तेजराव मानमाेडे, मधुकर पाटील, देवीदास अटाळकर, संजय धाेतरकर, जागाेजी मानवटकर, धनराज टाले, ललित कुथे, गजानन चिंचपुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.