लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिडचिड वाढविणारी गरमी आणि वाढत्या उन्हामुळे वातावरण गरम झाले आहे. यापासून बचाव करण्यासाठी कुलर आणि एसीचा वापर करण्याकडे अनेकांचा कल असेल. थंड पाणी आणि थंड पदार्थाचे सेवन करण्याची अनेकांची इच्छा असेल. पण थांबा, कोरोना आणि थंडीचे दाट नाते असल्याने सध्या तरी हे टाळाच, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकाची यासंदर्भात असलेली द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन ‘लोकमत’ने काही खासगी व शासकीय सेवेतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला असता, ही बाब चर्चेतून पुढे आली.डॉक्टरांच्या मते, प्रत्यक्षपणे थंड पाणी, थंड पदार्थ, कुलर किंवा एसीची गार हवा यासोबत कोरोनाचा प्रत्यक्ष संबंध नाही. मात्र कोरोनासाठी थंड वातावरण अधिक पोषक असल्याने यापासून सध्यातरी दूर राहण्याचाच प्रयत्न करायला हवा.रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने कोरोनाची शक्यताअप्रत्यक्षपणे कोरोनाचा थंड वातावरणासोबत दाट संबंध आहे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे आणि कुलर, एसीच्या वापरामुळे श्वसनाशी संबंधित आजार सर्दी, खोकला, न्यूमोनिया, छातीचे इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. या लक्षणामुळेच आजार वाढू शकतो. असे झाल्यावर उपचार करताना गोंधळ निर्माण होऊ श्कतो. त्यामुळे कोरोनाची तपासणी करावी लागेल. दुसरी मोठी समस्या म्हणजे अशा प्रकारच्या आजारपणात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोरोनाची संभावना थोडी वाढू शकते. रस्ता चांगला असेल तर काहीच अडचण नाही. मात्र रस्ता खराब असला तर तिथे कचरा जमा होतो, अगदी असेच तब्येतीचे असते. त्यामुळे कुलर, एसीच्या वापरासोबतच आंबट, थंड, संत्री, लिंबू, मोसंबी, दही, ताक, केळी यापासून दूर राहावे. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकलथंड पदार्थांपासून दूर राहणेच उत्तमथंड पाणी, कुलर यांचा संबंध कोरोनाशी नसला तरी सामान्यपणे सर्दी, खोकला, ताप, गळ्यात खवखव, गिळताना दुखणे असे शरीरात घडणारे बदल कोरोनाच्या लक्षणांशी मिळतेजुळते आहेत. यामुळे अशी लक्षणे आढळली तर कोविड-१९ ची तपासणी करणे आवश्यक असते. अशीच तक्रार सर्वांच्या बाबतीत होत असेल, तर ती गंभीरपणे घेतली पाहीजे. थंड पाणी आणि थंड पदार्थाच्या सेवनापासून दूर राहा. यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता अधिक असते. कुलर, एसीचा वापर मर्यादित करीत असाल तर उत्तमच आहे. मुले आणि वृद्ध व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.- डॉ. अनिल राऊत, बालरोग विशेषज्ञशरीराचे तापमान घटणे कोरोनाच्या दिवसात योग्य नव्हेथंड पाण्याचा उपयोग न करणे हेच उत्तम आहे. खरे तर याचा कोरोनाशी संबंध नाही, मात्र, शरीराचे तापमान कमी होणे हे कोरोनासाठी पोषक असते. अप्रत्यक्षपणे थंड पाणी, थंड पदार्थांचे सेवन, कुलर-एसीचा वापर यातून अन्य आजार होऊ शकतात. मात्र तरीही कोरोनाची चाचणी करावीच लागते. अशा प्रसंगी फक्त कोरोनाच नाही तर अन्य व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरिया इन्फेक्शन झाल्यावरदेखील थंड पाणी टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीराचे वातावरण कमी होऊन व्हायरस, बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. म्हणून थंड हवा आणि या पदार्थांपासून दूर राहणेच उत्तम आहे.-डॉ. सागर पांडे, उपअधीक्षक, मेयो
एसी, कुलरपासून स्वत:ला ठेवा दूर : कोरोनाशी अप्रत्यक्ष नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:15 AM
चिडचिड वाढविणारी गरमी आणि वाढत्या उन्हामुळे वातावरण गरम झाले आहे. यापासून बचाव करण्यासाठी कुलर आणि एसीचा वापर करण्याकडे अनेकांचा कल असेल. थंड पाणी आणि थंड पदार्थाचे सेवन करण्याची अनेकांची इच्छा असेल. पण थांबा, कोरोना आणि थंडीचे दाट नाते असल्याने सध्या तरी हे टाळाच, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देडॉक्टरांनी दिला खबरदारीचा सल्ला