नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी नागपुरात पोहोचले. ते १ जानेवारीपर्यंत फेटरीजवळील माहुरझरी येथील विपश्यना केंद्रात राहून ध्यानसाधना करतील. यावेळी ते म्हणाले, त्यांना जेव्हाही वेळ मिळतो ते विपश्यना करतात. सर्वांनीच विपश्यना करायला हवी. याचा चांगला लाभ होतो.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केजरीवाल डॉ. बाबासाहब आंबेडकर नागपूर विमानतळावर पोहोचले. ते येथून थेट फेटरीसाठी रवाना झाले. यादरम्यान पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, विपश्यनेने शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक लाभ मिळतो. त्यांना याचा व्यक्तिगत खुप फायदा मिळतो. ज्यांनी विपश्यना केली आहे, चांगले आहे . पण ज्यांनी केली नसेल त्यांनी एकदा अवश्य याचा लाभ घ्यावा. त्यांना निश्चितच याचा फायदा मिळेल.
मागच्या वर्षी जयपूरला गेले होते
केजरीवाल यांनी सांगितले की, विपश्यना ही भगवान बुद्धाद्वारे शिकवण्यात आलेली अडीज हजार वर्षांपूर्वी शिकवण्यात आलेली विद्या आहे. त्यांना जेव्हाही वेळ मिळता, ते आठवडा किंवा दहा दिवसासाठी विपश्यना करतात. मागच्या वर्षी ते जयपूरला गेले होते. देशात विपश्यनेचे अनेक केंद्र आहेत. त्यांना जेव्हा वेळ मिळतो आणि जिथे विपश्यना सुरू असेल ते त्या केंद्रात जातात. त्यासाठी ते नागपूरला आलेत.
राजकारणापासून दूर
विपश्यनेसाठी नागपुरात आलेल्या केजरीवाल यांनी यावेळी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी कुठलीही राजकीय चर्चा केली नाही. शनिवारी पक्षाची बैठकही होती. पक्षाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले की, स्थानिक पदाधिकाऱ्यांना अगोदरच सांगण्यात आले हाेते की, केजरीवाल यांचा अतिशय व्यक्तिगत दौरा आहे. राजकीय चर्चा होणार नाही. पक्षाचे प्रभारी दीपक सिंघला सुद्धा नागपुरातच होते. परंतु केजरीवाल यांनी पक्षासंदर्भात कुठलीही चर्चा केली नाही. पत्रकारांनी त्यांना राजकारणावर प्रश्न विचारला असता त्यांनी हाथ जोडले.