नागपूर : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. मागील काही कालावधीतील त्यांची ही पहिलीच भेट आहे.
सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते मुख्यालयात पोहोचले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दुसऱ्या शहरात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. राज्यपाल खान यांनी यावेळी इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले आहेत. त्यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.