शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

केरळ ते काश्मीर..एक थरारक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:50 AM

साधारणत: ‘आयपीएस’ अधिकारी म्हटले की एक साचेबद्ध जीवन असते, असा सर्वसाधारण समज आहे.

ठळक मुद्देविजय रमण यांनी उलगडली शौर्यगाथा : चंबळमध्ये डाकूंना घातले होते वेसण, एक अद्भूत कहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: ‘आयपीएस’ अधिकारी म्हटले की एक साचेबद्ध जीवन असते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र केरळपासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास ज्यावेळी चंबळ खोरे, पंतप्रधान निवासस्थान येथपासून ते थेट जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीयसीमारेषेपर्यंत येतो, तेव्हा निश्चितच त्या प्रवासात अनेक थरारक पैलू दडले असतात. स्वच्छ चारित्र्य, देशाभिमान, प्रामाणिक भावना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृदू स्वभाव जपत आयुष्यभर देशसेवा करणाºया विजय रमण यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभावे असेच. आपल्या आयुष्यातील रोमांचक प्रसंग रमण यांनी प्रकट मुलाखतीदरम्यान नागपुरातील नागरिकांसमोर मांडले आणि ऐकणाºयांच्या अंगावरदेखील शहारे आले.‘लोकमत’ आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळातर्फे लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल मैदानावर आयोजित नागपूर दुर्गोत्सवात सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी विजय रमण यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, नागपूर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम् प्रामुख्याने उपस्थित होते. देविका नाडिग यांनी ही मुलाखत घेतली. १९८१ साली विजय रमण हे भिंड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते.त्या काळी तेथे डाकूंची दहशत होती. पानसिंग तोमर, मलखाम सिंग, फुलनदेवी यांचा दरारा होता. १ आॅक्टोबर १९८१ रोजी मला पानसिंग तोमर भिंडजवळील एका गावात लपल्याची माहिती मिळाली. अपुरी संख्या असतानादेखील आम्ही गावाला वेढा घातला. मी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गुरैय्या तसेच काही सहकाºयांसह गावात आमच्या इतर पोलिसांना माहिती न देता प्रवेश केला. मात्र अचानक डाकूंचा गोळीबार सुरू झाला. आम्ही गावात आहो याची माहिती नसलेल्या पोलिसांनी दुसºया बाजूने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. परीक्षेची घडी होती व आम्ही तेथेच संयम ठेवून थांबण्याचे ठरविले. सुमारे चार तास आम्ही गोळीबार झेलत होतो व अखेर मध्यरात्रीनंतर डाकूंचा खात्मा करण्यात यश आले. या ‘एन्काऊंटर’नंतर डाकूंमध्ये भय निर्माण झाले. मला मलखाम सिंगने धमक्यादेखील दिल्या. मात्र नंतर त्याने आत्मसमर्पण केले, असे रमण यांनी सांगितले.१९८५ मध्ये त्याने दिल्लीत येऊन माझ्या घरी भेट घेतली होती, अशी आठवण रमण यांनी सांगितली. जम्मू-काश्मीरमध्ये सांभाळलेली विशेष सुरक्षा पथक स्थापनेची जबाबदारी, जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेला कुंपण घालण्याची मोठी जबाबदारी तसेच संसदेवर हल्ला करणाºया गाझीबाबाच्या ‘एन्काऊंटर’ची मोहीम याबाबत अनेक रोचक तथ्य यावेळी रमण यांनी मांडले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्ना मोहिले यांनी प्रास्ताविक केले. नीरज दोंतुलवार यांना संचालन केले. यावेळी विजय रमण यांच्या पत्नी वीणा रमण यांची विशेष उपस्थिती होती.अन् राजीव गांधी प्रभावित झालेमध्य प्रदेशात सुरक्षा ‘एआयजी’ असताना भोपाळ गॅसकांड झाले. यावेळी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अचानक दौरा ठरला. त्यावेळी कोणीच ‘एस्कॉर्ट’ अधिकारी नसल्याने माझ्याकडे ती जबाबदारी आली. ताफ्यात राजीव गांधींच्या गाडीच्या मागे माझी गाडी होती. मी अचानक ताफा थांबविला व राजीव गांधींच्या गाडीचा दरवाजा उघडला. त्यांची शाल दरवाजातून बाहेर आली होती. ती आत घेण्याची विनंती केली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह हेदेखील गाडीत होते. त्या गाडीतील सुरक्षा अधिकाºयावर मी त्यांच्या उपस्थितीत ओरडलो व गाडीला आतून लॉक का केले नाही, असा प्रश्न केला. ही बाब राजीव गांधी यांनी हेरली व पुढे ‘एसपीजी’त (स्पेशल सिक्युरिटी फोर्स) माझी निवड झाली, असे विजय रमण यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे ते सुरक्षा नियंत्रक होते. राजीव गांधी अनेकदा अनेक बाबींवर त्यांचा सल्ला घ्यायचे. राजीव गांधी हे ‘मॅन आॅफ आयडियाज्’ होते. त्यांच्या कार्यकाळात ज्या काही चुका झाल्या, त्या त्यांच्यामुळे नव्हे तर त्यांच्या सल्लागारांमुळे झाल्या, असे प्रतिपादन यावेळी रमण यांनी केले. रमण यांनी राजीव गांधी यांच्यासमवेत व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर व पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सुरक्षेचीदेखील जबाबदारी सांभाळली होती.३९ दिवसांत जगप्रदक्षिणाएकीकडे सुरक्षेसाठी दिवस-रात्र एक करणाºया विजय रमण यांनी थक्क करणारी गोष्टदेखील सांगितली. १९९१ साली त्यांनी कॉन्टेसा या कारमधून जगप्रदक्षिणा केली होती. नवीन कपिला नावाच्या माझ्या मित्राने मला ही कल्पना सांगितली. आम्ही ३९ दिवस ७ तास व ५५ मिनिटांत ४० हजार ७५ किलोमीटरचा प्रवास केला. केवळ एकाच दिशेने प्रवास करायचा व एका खंडात किमान २ हजार किलोमीटर गाडी चालवायची अशी अट होती. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने या विक्रमाची नोंद केली होती, असे विजय रमण यांनी सांगितले.