लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे रेल्वेचे ७ कर्मचारी मुंबईला तर ४० कर्मचारी नवी दिल्ली येथे अडकून पडले होते. दरम्यान हे कर्मचारी गुरुवारी केरळ एक्स्प्रे्रेस आणि थिरुकुरल एक्स्प्रेसने आपापल्या गावाकडे निघून गेले.रेल्वे मंत्रालयाने रेल्वेगाड्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे वारंगल येथील ७ कर्मचारी मागील तीन दिवसापासून मुंबईत अडकून पडले होते. मुंबईवरून ते गुरुवारी दुपारी १.२५ वाजता मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेसने नागपुरात आले. बुधवारी सायंकाळपासून हे कर्मचारी उपाशी होते. प्लॅटफार्म क्रमांक २ वर रेल्वेगाडी क्रमांक १२६४२ लागली. सर्र्व कर्मचारी या गाडीच्या एस ७ कोचमध्ये बसले. त्यांना भोजनाचे पॅकेट दिल्यानंतर त्यांना खूप बरे वाटले. दुपारी २.५२ वाजता ही गाडी पुढील प्रवासाला निघून गेली. थोड्या वेळानंतर दुपारी ४ वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२६२६ नवी दिल्ली-त्रिवेंद्रम केरळ एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीत ४० रेल्वे कर्मचारी होते. सकाळपासून त्यांनीही काहीच खाल्लेले नव्हते. पाचपावली येथील गुरुनानकपुरा दरबारातील सेवकांनी या कर्मचाऱ्यांसाठी ४० भोजनाची पाकिटे आणली होती. ही पाकिटे केरळ एक्स्प्रेसमधील उपाशी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर दुपारी ४.१५ वाजता ही गाडी त्रिवेंद्रमकडे रवाना झाली. ठिकठिकाणी ठप्प झालेल्या रेल्वेगाड्या आपापल्या मूळ रेल्वेस्थानकावर परत जात आहेत. त्यामुळे हे अडकून पडलेले रेल्वे कर्मचारी आपल्या कुटुंबीयांकडे परत जाऊ शकले.
केरळा, थिरुकुरल एक्स्प्रेसने ४७ रेल्वे कर्मचारी रवाना : मुंबई, दिल्लीला अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:46 PM
रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे रेल्वेचे ७ कर्मचारी मुंबईला तर ४० कर्मचारी नवी दिल्ली येथे अडकून पडले होते. दरम्यान हे कर्मचारी गुरुवारी केरळ एक्स्प्रे्रेस आणि थिरुकुरल एक्स्प्रेसने आपापल्या गावाकडे निघून गेले.
ठळक मुद्देनागपुरात केली भोजनाची सोय