लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पंतप्रधान महाआवास याेजना व राज्य शासनाच्या रमाई व शबरी आवास याेजनेत पारशिवनी तालुक्यातील अनुक्रमे केरडी व पालाेरा ग्रामपंचायतींनी अव्वल स्थान पटकावले आहे. या तिन्ही ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसाेबतच लाभार्थ्यांचा पारशिवनी पंचायत समितीच्या सभागृहात आयाेजित कार्यक्रमात गाैरव करण्यात आला.
पंतप्रधान महाआवास अभियानांतर्गत केरडी ग्रामपंचायतने प्रथम, पालोरा ग्रामपंचायतने द्वितीय तर नांदगाव ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक पटकावला. रमाई, शबरी महाआवास ग्रामीण अभियानांतर्गत पालोरा ग्रामपंचायतने प्रथम, केरडी ग्रामपंचायतने द्वितीय तर डुमरी (कला) ग्रामपंचायतने तृतीय पुरस्कार पटकावला.
आ. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, पंचायत समिती सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, पारशिवनीच्या नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, तहसीलदार प्रशांत सांगडे, पंचायत समिती सदस्य संदीप भलावी, करुणा भोवते, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर, माजी पंचायत समिती सदस्य मंगला निंबोने, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दियेवार उपस्थित होते.
प्रास्ताविक खंडविकास अधिकारी अशोक खाडे यांनी केले. संचालन खुशाल कापसे यांनी केले तर, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी शाखा अभियंता अंगद जाधव, घरकुल अभियंता मयूर घारड, कनिष्ठ अभियंता युवराज खोपे, स्थापत्य सहायक मनोहर जाधव, विनोद भोगे, देवानंद तुमडाम, विनोद घारड यांनी सहकार्य केले.
...
पुरस्कारप्राप्त लाभार्थी
या याेजनेंतर्गत घरकुलांचे उत्कृष्ट व नियाेजित काळात बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचाही गाैरव करण्यात आला. यात पंतप्रधान महाआवास ग्रामीण अभियानातील किसना हिवसे, रा. केरडी यांनी प्रथम, दशरथ काठोके, रा. केरडी यांनी द्वितीय, नितीन मोहने, रा. आमडी यांना तृतीय तसेच रमाई, शबरी महाआवास योजनेंतर्गत भीमाबाई गेडाम, रा. तामसवाडी यांनी प्रथम, बापूराव शिवारे, रा. तामसवाडी यांनी द्वितीय आणि शैलेश मेश्राम, रा. सालई (मोकासा) यांनी तृतीय पुरस्कार प्राप्त केला.
...
पुरस्काराचे स्वरूप
शासनाच्या वतीने ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणांतर्गत पंतप्रधान महाआवास व शबरी व रमाई महाआवास योजना राबविली जाते. या याेजनेंतर्गत घरकुलांच्या बांधकामाला गतिमान करणे व त्यात गुणवत्ता आणणे यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या काळात पंतप्रधान महाआवास ग्रामीण अभियान आणि राज्य पुरस्कृत रमाई, शबरी महाआवास ग्रामीण अभियान राबविण्यात आले. शासनाच्या निकषानुसार ग्रामपंचायत व व्यक्तिगत स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.
240821\img_20210823_123942.jpg
पुरस्कार स्वीकारताना ग्रामपंचायत पालोराचे सरपंच ,सचिव