शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

खरीपाचे वेध!

By admin | Published: April 15, 2016 2:58 AM

खरीप हंगामाला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असला, तरी कृषी विभागाने आतापासूनच खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे.

आढावा बैठकीची तयारी : जिल्ह्यात ४ लाख ८३ हजार लागवड क्षेत्र नागपूर : खरीप हंगामाला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असला, तरी कृषी विभागाने आतापासूनच खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मागील दोन वर्षाच्या दुष्काळानंतर यंदा विदर्भ व मराठवाड्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने संकेत दिले आहे. यामुळे निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांसह कृषी विभागाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. शेतकरी हा खरीप हंगामातील पेरणीपूर्वीच्या मशागतीला लागला आहे. तर कृषी विभाग नियोजनात व्यस्त झाला आहे. माहिती सूत्रानुसार पुढील आठवड्यात पालकमंत्री जिल्ह्याची खरीप आढावा बैठक घेऊ शकतात. त्यामुळे सध्या नागपूर कृषी विभागाला त्या बैठकीचे वेध लागले असून, संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण लागवडीखालील सरासरी क्षेत्र ४ लाख ८३ हजार ३६० हेक्टर आहे. त्यापैकी कापूस पिकाखाली ६३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र असून, सोयाबीनसाठी २ लाख ७४ हजार ३०० हेक्टर, धानासाठी ५९ हजार १०० हेक्टर व तूर पिकाखाली ५५ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. नागपूर कृषी विभागाने याच आकडेवारीच्या आधारे पुढील खरीप हंगामाची तयारी सुरू केली असल्याची माहिती एका कृषी अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, यावर्षी नागपूर कृषी विभागाने शेततळे व जलयुक्त शिवार योजनेवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच आता खरीप हंगामाची सुद्धा तयारी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)