शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

खासदार सांस्कृतिक महोत्सव; वाडकरांच्या कन्येचा ‘रियाज’ अन् वाद्यवृंदांची ‘काटकसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 10:53 AM

तिसऱ्या खासदार महोत्सवात रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सादर झालेल्या प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या ‘सूरमयी शाम’ या कार्यक्रमाने रसिकांची घोर निराशा केल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देमहोत्सवाचा दर्जा घसरणार नाही का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संगीतामुळे मेंदूला चैतन्य प्राप्त होते आणि तणावातून मुक्ती झाल्याने पुढच्या कामासाठीची स्फूर्ती मिळते. खासदार सांस्कृतिक महोत्सवातून नागपूरकर रसिकांना अशीच स्फूर्ती मिळत असते. खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी येणारे कलावंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आहेत. मागील दोन वर्षांत महोत्सवाने ही दर्जेदार परंपरा सांभाळली आहे. मात्र, तिसऱ्या खासदार महोत्सवात रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सादर झालेल्या प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या ‘सूरमयी शाम’ या कार्यक्रमाने रसिकांची घोर निराशा केल्याचे दिसून येते. वाडकरांसोबतच वाडकर कन्या अनन्याचा अपुरा रियाज आणि वाद्यवृंदांमध्ये केलेल्या काटकसरीने रसिकांनी वाडकरांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.गेल्या दोन वर्षांपासून महोत्सवात प्रख्यात कलावंतांसोबतच स्थानिक कलावंतही तोच दर्जा सांभाळत असल्याचे दिसूनही आले आहे. रविवारी महोत्सवात ‘सूरमयी शाम’ सादर करण्यासाठी आलेले प्रख्यात पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्या गायनाने सर्वांना जिंकले. परंतु, त्यांची कन्या अनन्या ही अजूनही गायकीचे प्राथमिक धडे घेत असल्याचे लक्षात आले. अनन्याला हतोत्साहित करण्याचा हा हेतू नाही. मात्र, वाडकर जर लाखो रुपये मानधन घेऊन महोत्सवात कार्यक्रम सादर करत असतील तर त्यांनी सोबत येणारे कलावंतही तेवढेच दर्जेदार व तयारीचे असणे गरजेचे आहे.अनन्याने सादर केलेले ‘मोह मोह के धागे’ हे गीत तर लहान मुलेदेखील छान गातात. केवळ वाडकरांची मुलगी आहे म्हणून श्रोत्यांनी ते सहन करायचे का? अनन्याची तयारी नसल्याचे पदोपदी जाणवत होते. तत्पूर्वी दोघांनीही सादर केलेले युगलगीत ‘मेघा रे मेघा रे’दरम्यान अनन्याचा घसरलेला स्वर सांभाळण्यासाठी खुद्द सुरेश वाडकरांनाच स्वत:चा माईक तिच्यापुढे धरावा लागला. माईक पकडण्याचे तंत्रही तिला अवगत नसल्याचे दिसून येत होते. तिला गायनासाठी उभे करण्यापूर्वी तिच्याकडून व्यवस्थित रियाज करवून घेणे गरजेचे होते.एखादी सामान्य कुटुंबातील अशाच गाणाºया मुलीला वाडकरांनी हे व्यासपीठ दिले असते का? खासगी मैफिलीमध्ये हे असे कौतुक समजून घेता येईल.संगीत ही साधना आहे आणि निसर्गाची देणगीही आहे. त्यामुळे वाडकरांसारख्या प्रथितयश गायकाच्या लक्षात अशा गोष्टी आणून देणे आवश्यक ठरते आणि नागपूरचे श्रोते ‘हलक्या’ कानाचे नाहीत, हे त्यांना सांगणे क्रमप्राप्त ठरते. या कार्यक्रमात पुरेसे संगीत वाद्यही नव्हते.कदाचित मिळालेल्या मानधनातील नफा वाढविण्यासाठी वाडकरांनी ही काटकसर केली असावी, असे श्रोतृवृंदात बोलले जात होते. एकप्रकारे वाडकरांनी नागपूरकर रसिकांची फसवणूक केल्याचा आरोपही दबक्या आवाजात केला जात होता.संगीताचा वारसा लादता येत नाहीशैक्षणिक, उद्योग, राजकीय क्षेत्रात असा वारसा खपून जातो. कला आणि संगीताच्या क्षेत्रात असा वारसा लादता येत नाही. अनेक कलावंतांनी असा वारसा लादण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरले, हे वाडकरांनी ध्यानात घ्यावे. आयोजकांनीसुद्धा असे कार्यक्रम ठरविताना कलावंत मानधनासाठी जशी घासाघीस करतो, तसेच त्यांनी कार्यक्रमाचा दर्जा उत्तम राहील, अशी घासाघीस करणे अभिप्रेत आहे. अन्यथा असली फसवणूक होणार नाही, जशी रविवारी नागपूरकरांची झाली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक