शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खोब्रागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:22 AM

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक व विचारवंत डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमीचे मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची निवड झाली आहे. चिमूर, जि. चंद्रपूर येथे येत्या १६ व १७ मार्च रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले जाईल.

ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे १६ व १७ मार्च रोजी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक व विचारवंत डॉ. आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमीचे मराठी विभागप्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची निवड झाली आहे. चिमूर, जि. चंद्रपूर येथे येत्या १६ व १७ मार्च रोजी हे साहित्य संमेलन आयोजित केले जाईल.संमेलनाचे उद्घाटक म्हणून अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व प्रमुख पाहुणे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्यासह विचारवंत व लेखक अशोक भारती, भदंत ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये प्रामुख्याने उपस्थित राहतील. प्रा. खोब्रागडे हे मूळ चिमूरजवळच्या खापरी येथील रहिवासी असून, चिमूर येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्याचा निर्णय आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. प्रा. खोब्रागडे यांचे कविता, समीक्षण व साहित्य संशोधनपर कार्यात विशेष योगदान असून, आतापर्यंत त्यांचे १६ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात राज्यभरातून ५०० हून अधिक साहित्यिक सहभागी होणार असून, विविध कार्यक्रमात अनेक लेखक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार व विचारवंत आपले विचार मांडणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. भूपेश पाटील, सचिव सुचित मुरमाडे व कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र तिरपुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्य