शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

स्वत:चेच अपहरण, स्वत:च केली खंडणीची मागणी अन् स्वत:च दिली जीवे मारण्याची धमकी

By नरेश डोंगरे | Published: April 30, 2023 9:07 PM

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने तरुण बेभान : जन्मदात्यांनाच धरले वेठीस

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील एक व्यक्ती घामाघूम होऊन रेल्वे पोलीस ठाण्यात शिरतो. त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर प्रचंड दडपण अन् बऱ्याच शंका-कुशंका दिसतात. त्या बघून रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद, त्यांचे सहकारी काही वेळेसाठी अस्वस्थ होतात. काही तरी गंभीर असल्याचा अंदाज आल्यामुळे पोलीस त्या व्यक्तीला 'काय झाले' अशी थेट विचारणा करतात. 'मुलाचे अपहरण झाले. सुटकेसाठी दोन लाख रुपयांची खंडणी अपहरणकर्ते मागत आहेत. खंडणीची रक्कम दिली नाही तर'... असे म्हणताना ते रडायचेच बाकी राहतात. आपल्या मोबाईलमध्ये कथित अपहरणकर्त्यांनी पाठविलेले मुलगा रोशन (काल्पनिक नाव, वय २१) याचे फोटोही पोलिसांना दाखवितात. तातडीने मदत करा, नाही तर.... म्हणत रोशनचे वडिल रडू लागतात.

फोटोत रोशनचे पाय आणि तोंडाला स्कार्फ बांधून दिसतो. त्याचे हात मात्र त्याने स्वत:च पाठीमागे घेतल्यासारखे दिसते. त्यामुळे पोलीस चमकतात. ठाणेदार काशिद लगेच आपल्या वरिष्ठांना माहिती देऊन अपहृत रोशनच्या मोबाईलवर संपर्क करतात. तो प्रतिसाद देत नाही मात्र व्हॉटस्अॅपवर चॅटिंग करतो. त्यामुळे पोलिस अधिकारी त्याचे मोबाईल लोकेशन काढून वेगवेगळ्या चमू कामी लावतात. तीन - चार तास शोधाशोध केल्यानंतर कथित अपहृत रोशन झिरो माईल जवळ दिसून येतो. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या कथित अपहरणनाट्याचा दुसरा अंक सुरू होत आणि तो संबंधितांना स्तंभित करणारा ठरतो.

रोशन नोकरीचे ट्रेनिंग आहे म्हणून ८ एप्रिलला भोपाळला जातो, असे सांगून तो गावातून बाहेर पडतो. २४ एप्रिलपर्यंत त्याचे कुटुंबीयांशी फोनवर बोलणे सुरू असते. भोपाळला ट्रेनिंग झाले आणि आता नागपूरला रेल्वेस्थानकावर हिरवी झेंडी दाखविण्याची आपल्याला नोकरी मिळाली, असे तो सांगतो. त्यामुळे घरची मंडळी जाम खूष होते. मात्र, २४ तारखेनंतर त्याचा मोबाईल बंद होतो अन् २५ तारखेला त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांना त्याचे अपहरण झाल्याचा मेसेज येतो. पुढचे दोन दिवस दोन लाख रुपयांच्या खंडणीचे मेसेज, रोशनचे तोंड, पाय बांधलेले फोटो अन् धमक्याही मिळतात.'सब कुछ झूठ !

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर रोशनने वडिलांसोबतच प्रारंभी पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पोलिसांनी त्याची थोडीफार कानशेकणी करताच तो हलका होतो. वडिलांना त्याने नोकरी मिळाल्याची दिलेली गोड बातमी, त्यानंतर त्याचे झालेले अपहरण आणि त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर हात-पाय तोंड बांधल्यासारखे दिसणारे फोटो 'सब कुछ झूट' असल्याचे तो कबुल करतो.

म्हणून रचला डावरोशनला ऑनलाईन रमी खेळण्याचा शाैक आहे. त्यामुळे घरून मिळणारे सर्व पैसे तो रमीत उडवित होता. घरून नागपुरात आल्यानंतर तो बर्डीतील एका लॉजमध्ये थांबला होता. तेथे त्याने जवळची सर्व रक्कम रमीत उडवली अन् लॉजचे चार हजारांचे बीलही थकविले. ते वसुल करण्यासाठी वारंवार फोन येत असल्याने त्याने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचून स्वत:च वडिलांना आधी एक तर नंतर दोन लाखांची खंडणी मागून स्वत:लाच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कबुल केले.

रम असो, रमा असो की रमी...म्हणतात की, रम असो, रमा असो की रमी यात जो गुंतला त्याची मती फिरतेच. नंतर तो काय करेल, त्याचा नेम नसतो. आपण काय करतो, त्याचेही त्याला भान नसते. या प्रकरणात रमीच्या आहारी गेलेल्या रोशनचे वर्तन असेच बेभान होते. त्यामुळे त्याने सलग तीन दिवस आपल्या जन्मदात्यांचे, नातेवाईकांचे अन्न-पाणी कडू केले. मात्र, पीआय मनीषा काशिद, एपीआय अश्विनी पाटील, पीएसआय ओमप्रकाश भलावी आणि अंमलदार प्रवीण खवसे यांनी रोशनचे वडिल पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर अवघ्या तीन तासांत रोशनचा छडा लावून या कथित अपहरण अन् खंडणी प्रकरणातील वास्तव बाहेर आणले.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण