शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

पतंगीच्या वादातून तरुणाची हत्या

By admin | Published: January 16, 2016 3:25 AM

पतंग उडविताना झालेल्या हुल्लडबाजीत दोन गटात हाणामारी झाली अन् त्याचे पर्यवसान एका तरुणाच्या भीषण हत्येत झाले.

नागपूर : पतंग उडविताना झालेल्या हुल्लडबाजीत दोन गटात हाणामारी झाली अन् त्याचे पर्यवसान एका तरुणाच्या भीषण हत्येत झाले. हल्लेखोरांनी दुसऱ्या एका तरुणालाही गंभीर जखमी केले. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास सक्करदऱ्यातील आशीर्वादनगरात ही थरारक घटना घडली. यामुळे दिवसभर या भागात तणाव होता.मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्यासाठी जुनी बिडीपेठ येथील चंद्रशेखर ऊर्फ शेखर दामोदर वडसकर (वय ३०), सागर रामदास गायकवाड (वय ३०), शंकर मारबते, उलुंगा आणि पठाण नामक तरुण आज सकाळीच घराबाहेर पडले. त्यांनी सक्करदऱ्यातील आशीर्वादनगर, बजाज बिल्डिंगसमोरच्या मैदानात पतंगबाजी सुरू केली. ‘ओ काट... ओ पार...’ असे सुरू असतानाच हुल्लडबाजीत या तरुणांमधील एक जण चुकून ताजबागमधील काही तरुणांच्या घोळक्यात गेला. तेथे धक्का लागल्यावरून वाद झाला. त्यामुळे दोन्हीकडील तरुणांनी एकमेकांना मारहाण केली. आठ ते दहा आरोपींचा समावेशपतंगीच्या वादातून तरुणाची हत्या नागपूर : घटनेआधी दुसऱ्या गटातील तरुण निघून गेले. अर्ध्या तासातच तीन दुचाक्यांवर आठ ते दहा आरोपी हत्यार घेऊन मैदानाजवळ आले. त्यांनी दुचाक्यांवरूनच शिवीगाळ करीत सागर, शेखर आणि त्याच्या मित्रांकडे धाव घेतली. ते पाहून इतर सर्व पळून गेले. सागर मात्र आरोपींच्या तावडीत सापडला. त्यामुळे त्यांनी सागरला शस्त्राने भोसकणे सुरू केले. ते पाहून शेखर मदतीला धावला. तो हात जोडून आरोपींना सागरला सोडून देण्याची विनंती करीत होता. मात्र, आरोपींनी सागरला मारणे सुरू ठेवतानाच शेखरवर शस्त्राचे सपासप घाव घालून त्यालाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या थरारक प्रकारामुळे आजूबाजूच्यांनी आरडाओरड केली. काहींनी पोलिसांनाही फोन केले. त्यामुळे आरोपी आपापल्या मोटरसायकलवर पळून गेले. जखमी शेखर आणि सागरला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शेखरला मृत घोषित केले. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. सक्करदरा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. वरिष्ठांनीही धाव घेतली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मोठ्या संख्येत पतंगबाजांची गळेकापू स्पर्धा सुरू होती. मात्र, अनेकांदेखत ही हत्या होऊनही पोलिसांना आरोपींबाबत माहिती देण्यासाठी कुणी पुढे आले नाही. केवळ तीन ते चार मोटरसायकलवर आठ ते दहा आरोपी होते, एवढेच काही जण सांगत होते.(प्रतिनिधी)मित्राच्या नादात जीव गमावला शेखर हा त्याच्या आईवडीलांना एकुलता एक मुलगा होता. तो विमानतळावर इलेक्ट्रीशियन म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. त्याचे वडील दामोदर वडसकर वीज मंडळाचे निवृत्त कर्मचारी आहे. शेखरचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले. तो सकाळपासून आपल्या घरीच पत्नी शिल्पासह पतंग उडवित होता. मित्रांनी त्याला सोबत चलण्यास जबरदस्ती केली. त्यामुळे पत्नीला तो मांजा आणि पतंग घेऊन येतो, असे सांगून मित्रांसोबत गेला. तासा-दीड तासानंतर त्याची हत्या झाल्याचीच माहिती त्याच्या घरच्यांना कळली. शेखरचे वडील व पत्नी दोघेही बेशुद्ध पडले.