शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कुशच्या मारेकऱ्याची तिहेरी जन्मठेप कायमच

By admin | Published: March 12, 2016 3:13 AM

बहुचर्चित नंदनवन येथील कुश कटारिया या शाळकरी मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती ...

सर्वोच्च न्यायालय : आयुष पुगलियाची याचिका फेटाळली नागपूर : बहुचर्चित नंदनवन येथील कुश कटारिया या शाळकरी मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती पी. सी. घोष आणि न्या. अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने आरोपीची विशेष अनुमती याचिका फेटाळून उच्च न्यायालयाने सुनावलेली तिहेरी जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. आयुष नरेश पुगलिया (२५), असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी ले-आऊट शांतीनाथ अपर्टमेंट येथील रहिवासी आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जे. अकर्ते यांच्या न्यायालयाने ४ एप्रिल २०१३ रोजी आयुष पुगलिया याला भादंविच्या ३६४ कलमांतर्गत जन्मठेप, एक हजार रुपये दंड, ३०२ कलमांतर्गतही जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. भादंविच्या २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. जन्मठेपेच्या दोन्ही शिक्षा एकामागे एक भोगाव्या लागतील, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले होते. या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान म्हणून आरोपी आयुष पुगलिया याने फौजदारी अपील दाखल केले होते. सरकार पक्ष आणि फिर्यादीकडून आरोपीच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी अपील दाखल करण्यात आले होते. २२ जून २०१५ रोजी न्यायालयाने दोन्ही अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. या शिवाय भादंविच्या ३६४-ए कलमांतर्गत आणखी एका जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी आयुष पुगलिया याला तिहेरी जन्मठेप सुनावण्यात आली होती.आयुष पुगलिया याने उच्च न्यायालयाने सुनावलेल्या तिहेरी जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने आणि फिर्यादी प्रशांत कटारिया यांनी आरोपीच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या सर्व विशेष अनुमती याचिकांवर सुनावणी होऊन फेटाळण्यात आल्या.अपहरण करून केली होती कुशची हत्याकुशच्या मारेकऱ्याची तिहेरी जन्मठेप कायमचनागपूर : आरोपी आयुष नरेश पुगलिया आणि आठ वर्षीय शाळकरी मुलगा कुश प्रशांत कटारिया हे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी ले-आऊट येथील शांतिनाथ अपार्टमेंट या एकाच वसाहतीत राहत होते. दोघांचेही फ्लॅट आमोरासमोर होते. कुशचे वडील प्रशांत कटारिया हे कळमना येथे मिरची दलाल आहेत. आयुषने दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ११ आॅक्टोबर २०११ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खाऊचे आमिष दाखवून कुशचे अपहरण केले होते. अपहरणानंतर आरोपीने कुशची आई छाया हिला फोनवर दोन कोटीच्या खंडणीची मागणी करून कुशला ठार मारण्याची धमकी दिली होती. आयुषने निष्पाप कुशला कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानानजीकच्या अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये नेले होते. या ठिकाणी कुशच्या डोक्यावर विटेने प्रहार करून त्याचा निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून आरोपी पसार झाला होता. १२ आॅक्टोबर २०११ रोजी प्रशांत कटारिया यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात आपला मुलगा कुशच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार नंदनवन पोलिसांनी आयुषविरुद्ध भादंविच्या ३६३, ३६४-ए, ३६८, १२०-ब कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. लागलीच आयुषला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या कबुलीवरून १४ आॅक्टोबर रोजी कुशचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर भादंविच्या ३०२, २०१ या कलमांची वाढ करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयात हा खटला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम तसेच फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी चालविला होता. (प्रतिनिधी)