शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

किशोर गजभियेंच्या काँग्रेस एन्ट्रीने ‘उत्तर’मध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:05 PM

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्दे राऊत समर्थकांची चिंता वाढली : प्रदेश काँग्रेसची खेळी असल्याची चर्चा

 लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर: विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे गजभिये यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. असे असतानाही आता गजभिये यांच्या काँग्रेस प्रवेशाने भविष्यात उत्तरच्या तिकिटाचा प्रश्न पक्षासमोर निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यामुळे राऊत समर्थकांची चिंता वाढली आहे.माजी सनदी अधिकारी व रिपाइं नेते उत्तम खोब्रागडे आणि माजी सनदी अधिकारी व बसपा नेते किशोर गजभिये यांनी आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. गजभिये यांनी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी व राज्याचे विक्रीकर उपायुक्त म्हणून काम केले आहे. गजभिये यांचा प्रवेश हा प्रदेश काँग्रेसची ‘राजकीय खेळी’ असल्याचे बोलले जात आहे. किशोर गजभिये यांनी सर्वप्रथम विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे भाजपाचे अनिल सोले विजयी झाले व काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना तिसऱ्याक्रमाकांवर समाधान मानून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत गजभिये हे उत्तर नागपुरात बसपाकडून रिंगणात उतरले. त्यावेळीही गजभिये यांनी दुसऱ्या क्रमाकांची मते घेतल्यामुळे भाजपाचे डॉ. मिलिंद माने विजयी झाले व काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत तिसऱ्या क्रमांकावर घसरले. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. विशेष म्हणजे राऊत व गजभिये यांच्यात ५ हजार १४५ मतांचे अंतर होते.विधानसभा निवडणुकीनंतर गजभिये यांनी बंड करीत बसपा सोडली व बीआरएसपीमध्ये प्रवेश घेतला होता. कालांतराने ते बीआरएसपीपासूनही दुरावले. आता निवडणुका तोंडावर असताना त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडला आहे. गजभियेंचा राजकीय प्रवास पाहता आता ते काँग्रेसचा ‘हात’ किती काळ पकडून ठेवतात हे येत्या काळात स्पष्ट होईल.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर