लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर चाकूहल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणात जखमी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. मानकापुरातील जखमीचे नाव बॉबी मनोजसिंग रावत असून ते मानकापूरच्या गणपती नगरात राहतात. बॉबीचा मित्र राहुल याचा रविवारी बर्थडे होता. तो त्यांनी साजरा केला. मात्र आरोपी साहिल ऊर्फ नानू विनोद सारवान याला बोलावले नाही. त्यामुळे आरोपी साहिलने तो राग मनात ठेवून रविवारी मध्यरात्री झिंगाबाई टाकळीतील नेताजी सोसायटीच्या बाजूला आरोपी साहिल तसेच शुभम उदयभान ठाकूर या दोघांनी बर्थडेला का नाही बोलावले यावरून वाद घातला. त्याला आधी हातबुक्कीने मारहाण केली. नंतर धारदार चाकूने भोसकले. यात बॉबी गंभीर जखमी झाला. सतीश भास्करराव उपासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी साहिल आणि शुभम या दोघांना अटक करण्यात आली. जखमी बॉबी इस्पितळात उपचार घेत आहेत.एमआयडीसीतील भीमनगरात आरोपी पवन केतकास आणि लंकेश देवकरण बडगे (वय २५) हे दोघे मित्र आहेत. दारूच्या नशेत पवनने लंकेश याच्याशी रविवारी दुपारी २ च्या सुमारास वाद घातला आणि त्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची आई प्रमिला देवकरण बडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.महिलेने लावला गळफाससोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद सोसायटीत राहणाऱ्या सुनीता राकेश पटेल (वय ३०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. सुनीता यांना डोकेदुखीचा मोठा त्रास होता. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी उपचारही केले होते. परंतु फायदा होत नसल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या. त्यातून त्यांनी गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे. सुनीता यांना दोन मुले असून त्यांच्या पतीचे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान आहे. अजय रामदास पटेल यांनी दिलेल्या माहितीवरून चौकशी केल्यानंतर पीएसआय ढाकुलकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात चाकूहल्ला : मित्र ठरले शत्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:53 AM