लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजीविक्रेत्या भावाने रात्रीच्यावेळी उरलेल्या काकड्या आईच्या दुकानात ठेवल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने त्याच्या भावावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. शांतिनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. विजय भगवान वाकोडीकर (वय ३५) असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते बस्तरवारी गोंडपुऱ्यात राहतात. जितेंद्र भगवान वाकोडीकर (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे.विजय आणि जितेंद्र हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ते आणि त्यांची आई भाजीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे रविवारी दिवसभर दहीबाजार दलालपुºयात त्यांनी भाजी विकली. सायंकाळच्या सुमारास उरलेल्या काकड्या विजयने त्याच्या आईच्या दुकानात ठेवल्या. त्यामुळे जितेंद्रने त्याला विरोध केला. यावरून दोन भावांमध्ये वाद वाढला आणि आरोपी जितेंद्रने भाजी कापण्याच्या चाकूने विजय वाकोडीवर याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यात तो जबर जखमी झाला. जखमी विजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून शांतिनगर पोलिसांनी जितेंद्र वाकोडीकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
क्षुल्लक वादातून चाकूहल्ला : सख्खा भाऊ बनला शत्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 7:55 PM
भाजीविक्रेत्या भावाने रात्रीच्यावेळी उरलेल्या काकड्या आईच्या दुकानात ठेवल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने त्याच्या भावावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
ठळक मुद्देशांतिनगरात गुन्हा