लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागात प्लॉट विक्रीच्या नावावर साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉट विक्रीची अग्रिम रक्कम घेऊनही रजिस्ट्रीसाठी टाळाटाळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.शालिनी हेडाऊ आणि सेवाराम हेडाऊ रा. बजरंगनगर सोसायटी सेमिनरी हिल्स अशी आरोपींची नावे आहे. शालिनी हेडाऊ यांचा मौजा बोखारा, पटवारी हल्का नंबर १२, खसरा क्रमांक ६८ वर प्लॉट नंबर २३ आहे. फिर्यादी जुगल अग्रवाल (५३) रा. गोकुळपेठ यांची मुलगी भारती अग्रवाल यांनी आरोपीसोबत या प्लॉटचा १३ जुलै २०१३ रोजी ८ लाख ३२ हजार, ५०० रुपयात सौदा केला होता. तसा रजिस्टर्ड विक्री करारनामाही केला होता. यासाठी अग्रवाल यांनी प्लॉट मालक असलेल्या शालिनी यांना ३ लाख ५० हजार रुपये अग्रीम रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिली होती. ही रक्कम त्यांनी चेकद्वारे दिली होती. उर्वरित रक्कम त्या लवकरच देणार होत्या. तरीही शालिनी या प्लॉटची रजिस्ट्री करण्यासाठी टाळाटाळ करीत होत्या. दरम्यान शालिनी हेडाऊ यांनी संबंधित प्लॉट पती सेवाराम हेडाऊ यांच्या नावावर परस्पर ट्रान्सफर करून घेतला. अशाप्रकारे खरेदीदार फिर्यादी बकाया रक्कम देण्यास तयार असूनही त्यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कोराडीत प्लॉट विक्रीच्या नावावर साडेतीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:45 PM
कोराडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या ग्रामीण भागात प्लॉट विक्रीच्या नावावर साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्लॉट विक्रीची अग्रिम रक्कम घेऊनही रजिस्ट्रीसाठी टाळाटाळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देअग्रिम रकम घेऊनही रजिस्ट्रीसाठी टाळाटाळ