देवेंद्र फडणवीस : महालक्ष्मी जगदंबा मातेचे घेतले दर्शनकोराडी : महालक्ष्मी जगदंबा मातेचे अधिष्ठान लाभलेले कोराडी हे तीर्थक्षेत्र देशात आकषर्णाचे केंद्र बनावे. कोराडी पर्यटनस्थळाच्या आराखड्याला लवकरच अंतीम मंजुरी प्रदान करण्यात येणार असून, या स्थळाचा झपाट्याने विकास होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. पूजा आटोपल्यानंतर त्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री तथा संस्थान कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, अप्पर सचिव आनंद कुळकणी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूरचे महापौर प्रवीण दटके, महादुला नगर पंचायत अध्यक्ष कांचन कुथे, उपाध्यक्ष राजेश रंगारी, मुख्याधिकारी संघमित्रा ढोके, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, उपसरपंच अर्चना दिवाणे, उत्तम झेलगोंदे, अरविंद खोबे, संस्थानचे सचिव केशव फुलझेले, दयाराम तडस्कर, बाबूलाल पटेल, प्रेमलाल पटेल दत्तू समरीतकर, अविनाश हेडाऊ, दिलीप सावरकर, बी. जे. लांडे, अमरजीत गोडबोले, संजय दिवाणे, डी. एच. सोनवणे, संजय मैंद, विठ्ठल निमोने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणे तसेच कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी मातेला साकडे घातले. (प्रतिनिधी)
कोराडी पर्यटनस्थळांचा विकास होणार!
By admin | Published: October 19, 2015 3:00 AM