चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना न्यायालय लवकरच सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 08:10 PM2018-03-21T20:10:33+5:302018-03-21T20:10:47+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे लवकरच न्यायालय सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

Korpana court in Chandrapur district will be operational soon | चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना न्यायालय लवकरच सुरू होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना न्यायालय लवकरच सुरू होणार

Next
ठळक मुद्देसरकारची उच्च न्यायालयात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे लवकरच न्यायालय सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
कोरपना येथे न्यायालयासाठी इमारत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दोन वर्षापूर्वी सर्व प्रकारचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु, येथे अद्याप न्यायालय सुरू झाले नाही. काही समाजकंटक येथील बांधकामाची तोडफोड करीत आहेत. तसेच, किमती वस्तू चोरल्या जात आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पवनकुमार मोहितकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारची माहिती लक्षात घेता, त्यावर येत्या सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, हायकोर्ट प्रशासनातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

Web Title: Korpana court in Chandrapur district will be operational soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.