शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

कोष्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जाची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 7:30 AM

आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. नंदा पराते व डी. बी. नंदकर यांनी ही याचिका दाखल केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोष्टी हे हलबा असल्याचा दावा करून कोष्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका नागपूर खंडपीठाने गुरुवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.

आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. नंदा पराते व डी. बी. नंदकर यांनी ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना वर्तमान परिस्थितीत अनुसूचित जमातीसंदर्भातील कायदा स्पष्ट असल्याचे व त्यात हस्तक्षेप करण्यास काहीच वाव नसल्याचे सांगितले.  राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये हलबाचा समावेश आहे. या यादीत समावेश न करता कोष्टी समाजाला विशेष मागासवर्गामध्ये सामील करण्यात आले आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने ‘राजू वासावे’ यासह अन्य काही प्रकरणांमध्ये न्यायालयांना राज्यघटनेतील तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार नसल्याचे ठळकपणे सांगितले आहे. करिता, जनहित याचिकेतील मागणी मान्य करणे म्हणजे, राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केल्यासारखे होईल. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघनही होईल, असे उच्च न्यायालयाने पुढे नमूद केले.

याचिकाकर्त्यांवर बसवला दहा हजारांचा दावा खर्च ॲड. नंदा पराते यांचे पती प्रशासकीय अधिकारी चंद्रभान पराते यांचा हलबा-अनुसूचित जमातीचा दावा सर्वोच्च न्यायालयापर्यंत नामंजूर झाला आहे. त्यामुळे नंदा पराते यांना या विषयाची संपूर्ण माहिती आहे. असे असताना त्यांनी ही याचिका दाखल केली, तसेच पतीचे प्रकरण लपवून ठेवले, याकडे सहायक सरकारी वकील ॲड. ए. आर. चुटके यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन याचिकाकर्त्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च बसवला. 

..असे होते याचिकाकर्त्यांचे म्हणणेराज्य सरकारने २४ एप्रिल १९८५ रोजी जीआर जारी करून कोष्टी हे आदिवासी नसल्याचे जाहीर केले आहे. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. मध्य प्रांत व वऱ्हाड येथील हलबा व हलबी समाजाचे नागरिक विणकाम व्यवसाय करीत होते. त्यामुळे त्यांना कोष्टी संबोधले गेले, तसेच त्यांच्या दस्तावेजांवर कोष्टी जात नमूद करण्यात आली. परंतु, वास्तविकतेत कोष्टी हे  हलबा आहेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

 

 

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय