नागपूर : कोविड संक्रमणाने ग्रस्त अनेक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. अशा रुग्णांना मंदार सिराज हा युवक मानवीय दृष्टिकोनातून आसपास राहणाऱ्यांना इम्युनिटीने परिपूर्ण वस्तूंचा समावेश असलेले भोजन दररोज उपलब्ध करून देत आहे.
शहरात कोविडचे संक्रमण वेगाने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील काही लोकांच्या संपूर्ण कुटुंबांना कोविड आजार झाला आहे. अशा स्थितीत शेजारी राहणारे नागरिकही त्यांच्यापासून लांब अंतर ठेवत आहेत. अशावेळी मंदारचा उपक्रम प्रशंसनीय आहे. मंदार म्हणाले, संक्रमणाच्या स्थितीत रुग्णाला एकटे सोडणे योग्य नाही. काही रुग्णांना परिपूर्ण आहार मिळत नसल्याने त्यांची तब्येत जास्त खराब होऊ शकते. रुग्णांना परिपूर्ण आहारासह मौलिक आधाराची गरज असते. त्यामुळे आम्ही नि:शुल्क भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे रुग्णांनी स्वत:ला एकटे समजू नये आणि ते या आजारातून लवकर बरे व्हावेत. रुग्णालयात भरती रुग्णांनाही भोजन देण्यात येत आहे. मंदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून आतापर्यंत ६२ पेक्षा जास्त लोकांना नि:शुल्क भोजन उपलब्ध करून दिले आहे. मंदारचे आठ सहकारी भारती छत्तर, लक्ष्मी तिवारी, पूजा तिवारी, काजल तिवारी, नंदिनी तिवारी, रजत तिवारी, अपूर्व तिवारी आणि शुभम तिवारी सहकार्य करीत आहेत.
इम्युनिटी भोजनाची मागणी
मंदार म्हणाले, कोविड संक्रमणाने ग्रस्त रुग्ण भोजनात इम्युनिटीयुक्त वस्तूंची मागणी करीत आहेत. दररोज दोन वेळचे जेवण आणि नाश्ता देण्यात येत आहे. सोबतच सलाद आणि फळेसुद्धा देण्यात येत आहेत.