शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

नागपूर जिल्ह्यातील कृष्णा व वेणा नदी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:13 AM

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देसीएटीपी प्लाँट

चंदू कावळे ।लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत बुटीबोरी परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला नोटिसा बजावल्या. परंतु, त्या कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी नालीत सोडणे बंद केले नाही. ही बाब धोकादायक ठरू शकते.या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु, यातील काही कंपन्या त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतात. येथील दोन कंपन्यांनी त्यांच्या रसायनयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते चक्क नालीत सोडले.वास्तवात, या परिसरात नाल्यांचे बांधकाम पावसाने पाणी वाहून जाण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, त्यात रसायनयुक्त पाणी सोडल्या जात असल्याने ते बुटीबोरी व टाकळघाट शिवारातून वाहणाऱ्या कृष्णा व वेणा नदीच्या पाण्यात मिसळते.विशेष म्हणजे, या वसाहतीतील बहुतांश कंपन्यांना रसायनयुक्त पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही कंपन्या या रसायनयुक्त पाण्यावर ‘सीएटीपी’मध्ये प्रक्रिया करतात आणि नंतर त्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावतात. मात्र, या दोन कंपन्या त्याला अपवाद ठरल्या आहेत. त्या कंपन्या या रसायनयुक्त पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते नालीद्वारे नदीत सोडतात. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. या रसायनयुक्त पाण्याचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनातही गाजला; परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. ही समस्या वेळीच न सोडविल्यास ती भविष्यात घातक रूप धारण करेल, असा अंदाज काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला.

जीवाशी गाठपरिसरातील जनावरे या दोन्ही नद्यांच्या पात्रात नेहमीच पाणी पित असून, पात्रातील झिरपलेले पाणी विहिरी, बोअरवेल्स व अन्य जलस्रोतात येते. पात्रातील पाणी दूषित झाल्यास इतर जलस्रोत दूषित होतात. नदीतील दूषित पाणी प्यायल्याने जनावरे दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकाराची केवळ थातूरमातूर चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कुठलीही ठोस कारवाई कधीच करण्यात आली नाही. नदीतील पाणी दूषित झाल्यास ते सर्वांसाठीच धोकादायक ठरणार आहे.

सीएटीपी प्लाँटया पाण्यामध्ये काही अत्यंक घातक द्रव्य मिसळलेले असतात. ते मानवी व जनावरांच्या आरोग्यासाठी तसेच वनस्पतींसाठी धोकादायक ठरतात. या रसायनयुक्त पाण्यामुळे कुणालाही धोका उद्भवू नये म्हणून काही उद्योगपतींनी त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या आवारात सीएटीपी प्लाँट बसविले आहेत. रसायनयुक्त पाण्यावर या प्लाँटमध्ये प्रक्रिया केल्यानंतर त्यातील घातक द्रव्य नष्ट होतात. काही उद्योगपती केवळ पैसे वाचविण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या आवारात हा प्लांट बसवित नाही.

प्रदूषण मंडळाची नोटीसमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वानखेडे यांनी या दोन्ही कंपन्यांमधील रसायनयुक्त पाण्याची पाहणी केली. त्यात कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचे आढळून येताच कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्या. परंतु, कंपनी व्यवस्थापनावर या नोटीसचा काहीही परिणाम झाला नाही. या वसाहतीतील कंपन्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी क्षेत्र अधिकारी शुक्ला यांच्याकडे आहे. हा प्रकार न थांबल्यास कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत वानखेडे यांनी दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी