शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उमरेडच्या काेविड सेंटरसाठी कुहीच्या कार्यकर्त्यांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : येथील नूतन आदर्श महाविद्यालयात ८० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. विद्युत, पाणी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : येथील नूतन आदर्श महाविद्यालयात ८० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. विद्युत, पाणी, कुलर, गाद्या आदी संपूर्ण सुविधा याठिकाणी केल्या गेल्या. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, महसूल विभागाचा चमू, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा चमू दिमतीला लावत सद्यस्थितीत नवीन कोविड केअर सेंटर सज्ज झाले. असे असले तरी ऑक्सिजनअभावी याठिकाणच्या सेंटरचे घोडे अडले होते. अखेरीस कुही येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलदारपणा दाखवीत या कोविड सेंटरसाठी धाव घेतली.

साळवा (ता. कुही) येथील मातोश्री प्रभादेवी सेवा संस्थेचे संस्थापक प्रमोद घरडे यांनी स्वखर्चातून १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर आणि तेवढ्याच ऑक्सिजन क्रोमीटरची मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी (दि. २२) कोरोना रुग्णांसाठी लाखमोलाच्या ठरणाऱ्या या प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे. कोविड सेंटर उभारल्यानंतर ऑक्सिजनबाबतची समस्या समोर आली होती. प्रमोद घरडे यांच्या कानावर ही बाब आनंद राऊत, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, नगरसेवक सतीश चौधरी यांनी घातली. घरडे यांनी लागलीच सर्वताेपरी सहकार्याचा शब्द दिला. त्यांच्या या सामाजिक दायित्त्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तत्पूर्वी जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीसुद्धा या कोविड सेंटरला ५० बेडची मदत केली आहे. सदर कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी दिलीप राऊत, दिलीप सोनटक्के, अश्विन उके, नागसेन निकोसे, राहुल सोनटक्के, सुरेश चिचमलकर, परसराम पिल्लेवान, महेश तवले, संजय वाघमारे, रितेश राऊत, रामेश्वर सोनटक्के, अक्षय खानोरकर, राहुल मने, क्षितिज खानोरकर, अमोल खोब्रागडे आदींनी केली आहे.

....

उमरेडमध्ये तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती कोविड केअर सेंटर उभारत आहे. याकरिता ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज असल्याचे समजताच मी यासाठी लगेच तयारी दर्शविली. केवळ ऑक्सिजनच नव्हे, तर औषधोपचारसुद्धा महत्त्वाचा आहे. मी मदत करण्यास तयार आहे.

- प्रमोद घरडे, मातोश्री प्रभादेवी संस्था, साळवा (कुही)