लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निर्माणाधिन ईमारतीचा सज्जा कोसळल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा करुण अंत झाला तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. बेझनबाग परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. श्यामराव हरडे (वय ३८, रा. पार्वतीनगरए रामेश्वरी) असे मृताचे नाव आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव विनोद मून (वय ३२) असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे.सुत्रांच्या माहितीनुसार, बेझनबाग, कडबी चौकाजवळ विरेंद्रकुमार अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी एक ईमारत विकत घेतली. तिच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक एका माळळ्याचा सज्जा कोसळला. त्या मलब्यात श्यामराव हरडे आणि विनोद मून दबल्याने ते गंभीर जखमी झाले. अन्य मजुरांनी या दोघांनाही कसे बसे बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हरडेंना मृत घोषित केले. तर, विनोदची अवस्था गंभीर आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिकांनी ईमारतीजवळ गर्दी केली. माहिती कळाल्यानंतर जरीपटका पोलीसही पोहचले. पोलिसांकडून या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
नागपुरात सज्जाच्या मलब्यात दबल्याने मजुर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:55 AM
निर्माणाधिन ईमारतीचा सज्जा कोसळल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा करुण अंत झाला तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. बेझनबाग परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
ठळक मुद्देएक गंभीर जखमी : बेझनबागेतील घटना