लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : नगरपालिका प्रशासनाकडे गहाण असलेला भूखंड साेडविण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगरपालिकेचा रचनाकार व त्याच्या सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना अटक केली. ही कारवाई काटाेल नगर परिषद कार्यालय परिसरात शनिवारी (दि. ६) दुपारी करण्यात आली.
दिनेश गायकवाड व विपिन भांददकर अशी अटक करण्यात आलेल्या लाचखाेर नगररचनाकार व सहायकाची नावे आहेत. राधेश्याम बासेवार, रा. काटाेल यांचा काटाेलनगर पालिकेच्या हद्दीत खुटांबा राेडलगत भूखंड असून, ताे भूखंड पालिकेकडे गहाण आहे. शासकीय नियमानुसार लेआऊटची निर्मिती केल्यानंतर त्यातील काही भूखंड पालिकेकडे गहाण ठेवले हाेते. या लेआऊटमधील भूखंड क्रमांक-३५ गहाणमुक्त करण्यासाठी त्यांनी १ जुलै २०२० राेजी पालिकेच्या नगररचना विभागाकडे अर्ज केला हाेता.
या कामासाठी नगररचनाकार दिनेश गायकवाड याने त्यांना २ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली हाेती. घासाघीस केल्यानंतर या कामासाठी १ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, दिनेश गायकवाड व विपिन भांददकर यांनी बासेवार यांना अधिक रकमेची मागणी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नाेंदविली. ठरल्याप्रमाणे बासेवार यांनी दाेघांनाही शुक्रवारी (दि. ५) २५ हजार रुपये आणि शनिवारी एक लाख रुपये दिले. दरम्यान, एक लाख रुपये स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने दाेघांनाही रंगेहाथ पकडले व अटक केली.
भारत मेटकरी यांच्या भूमिकेबाबत पडताळणी सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, सहायक अधीक्षक राजेश दुदलवार, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, विनोद आडे, शालिनी जांभुळकर, भागवत वानखेडे, लक्ष्मण परतेती, सुशील यादव, शारीक अहमद यांच्या पथकाने केली.
...
गुंठेवारी प्रकरणातील आराेपी
काटाेल शहरातील गुंठेवारी प्रकरणात काही लाेकप्रतिनिधींसाेबतच नगररचनाकार दिनेश गायकवाड व सहायक रचनाकार विपिन भांददकार यांच्यावर भादंवि ४२० व इतर कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. तिन्ही कर्मचारी नगररचना विभागात दाेन वर्षांपूर्वी रुजू झाले आहेत. पालिकेतील काही अधिकारी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एवढ्या माेठ्या रकमेची लाच मागण्याचा हा काटाेल शहरातील पहिलाच प्रकार असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.