लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पातील ‘एफ’ टॉवरमध्ये करारानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत म्हणून, आनंदम टॉवर एफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यात आयोगाने गोदरेज प्रॉपर्टीज व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर यांना नोटीस बजावून ४ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तक्रारीवर पीठासीन सदस्य दिनेश सिंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सोसायटी सदस्यांनी २०१३ ते २०१५ या काळात एफ-टॉवरमधील फ्लॅट खरेदी केले. बिल्डर्सना करारानुसार रक्कम अदा केली. दरम्यान, सदस्यांना फ्लॅटस्चा ताबा देण्यात आला. त्यानंतर बिल्डर्सनी २७ पैकी २३ सुविधा पुरविल्या नसल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. तसेच, करार करताना प्रत्येक सदस्याकडून क्लब हाऊस बांधण्याकरिता दोन लाख रुपये घेण्यात आले होते. परंतु, क्लब हाऊस अद्याप बांधण्यात आले नाही. देखभाल खर्चाकरिता २०० रुपये चौरस फुटाप्रमाणे रक्कम घेण्यात आली होती. त्यापैकी ७५ टक्के रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ती रक्कम वेळेत देण्यात आली नाही. सदस्यांना फ्लॅटचे विक्रीपत्र करून देण्यात आले नाही. प्रकल्प व्यवस्थापनासाठी संस्था स्थापन करण्यात आली नाही. बांधकाम दोषपूर्ण करण्यात आले. दोषपूर्ण अग्निशमन यंत्रे लावण्यात आली. प्रत्येकाला स्वतंत्र पाईप लाईन देण्यात आली नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही काहीच दखल घेण्यात आली नाही असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांतर्फे अॅड. रोहण छाबरा यांनी कामकाज पाहिले.
गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटीत सुविधांचा अभाव : राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 9:22 PM
गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी प्रकल्पातील ‘एफ’ टॉवरमध्ये करारानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत म्हणून, आनंदम टॉवर एफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे.
ठळक मुद्देगोदरेज प्रॉपर्टीज, गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस