लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : भाेजापूर या गावाचा समावेश मानापूर (ता.रामटेक) या गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. भाेजापूर येथे गणपती नगर नावाचे नवीन ले-आउट तयार करण्यात आले असून, तिथे नागरिकांनी घरांचे बांधकाम करून वास्तव्य सुरू केले आहे. या नवीन ले-आउटमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, शिवाय सरपटणाऱ्या विषारी प्राणी व किटकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानापूर व भाेजापूर ही गावे रामटेक शहरालगत आहेत. भाेजापूर येथील गणपती नगरात भूखंडांची निर्मिती करून त्यांची विक्री करण्यात आली. गरजूंनी भूखंड खरेदी करून त्यावर घरांचे बांधकाम केले आणि त्या घरांमध्ये कुटुंबीयांसह राहायला सुरुवात केली, परंतु ले-आउटची निर्मिती करताना या भागात काेणत्याही मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली नाही. या नगरात पिण्याच्या पाण्याची काेणतीही साेय नाही. घरांमधील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकामही करण्यात आले नाही.
या नगरातील रस्ते केवळ मातीचे असून, त्यांचे साधे खडीकरणही करण्यात आले नाही. हा भाग विकसित केला नसल्याने, तसेच झुडपांचे प्रमाण अधिक असल्याचे येथे साप, विंचू व अन्य विषारी सरपटणाऱ्या इतर किटकांचा वावर आहे. त्यामुळे या नगरातील समस्या साेडविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी पुरुषाेत्तम बाेंद्रे, दिलीप लिमजे, शालिक माकडे, उपासराव वाडीभसमे, प्रदीप गवळीवार यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांनी केली आहे.
...
या भागातील विविध समस्यांची जाणीव आहे. या समस्या साेडविण्यासाठी, तसेच तिथे मूलभूत विकास कामे करण्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी खनिज विकास निधीतून मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करून ताे वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाल्यानंतर येथील कामे केली जातील.
- संदीप सावरकर, सरपंच, मानापूर