स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या वस्त्यात तीन वर्षांत गटार लाईन, पथदिवे, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. गटार लाईन नसल्याने जागोजागी घाण पाणी साचत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या कामाला कधी सुरुवात होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
...
रात्री अंधाराचे साम्राज्य
स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भागातील अनेक वस्त्यांत पथदिवे नसल्याने रात्रीला अंधाराचे साम्राज्य असते. पावसाळ्याच्या दिवसात रात्री कामावरून येणाऱ्यांना अंधारात चिखल तुडवत रस्ता शोधावा लागतो. यामुळे अपघात होण्याचाही धोका आहे.
...
पूल झाला; पण खड्डे कोण बुजविणार?
भरतवाडा ते पावनगाव मार्गावरील पिवळी नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. परंतु, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलाचे काम करताना खड्डे मात्र बुजविण्यात आलेले नाहीत.
...
स्मार्ट सिटीच्या नावाखाली लोकांची फसवणूक
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. न्यू भरत नगर, जाम नगर, धर्म नगर, कन्या नगर, शिव शंभू नगर, मानसी ले-आऊट परिसरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचे पवन शाहू यांनी सांगितले. त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
...
३१ मार्च २०२१ पर्यंत प्राप्त निधी (कोटी)
केंद्र सरकार -२१७.२३
राज्य सरकार -१०८.६२
मनपा व नासुप्र -१५०
एकूण प्राप्त निधी- ४७५.८५
झालेला खर्च -२९७.४९