उमरेड : स्थानिक संताजी फाऊंडेशन व तेली समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात गुणवंत विद्यार्थी, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मांगो लेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. राजू पारवे, आ. रामदास आंबटकर, आ. कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, वंदना बालपांडे, कविता साखरवाडे, प्रमिला दंडारे, पुष्कर डांगरे, ईस्तारी तळेकर, शालू गिल्लुरकर, गीतांजली नागभिडकर, जयश्री देशमुख, जितेंद्र गिरडकर उपस्थित होते. देहदानाची चळवळ रुजविणारे डॉ. चंद्रकांत मेहेर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील शंभरावर गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव करण्यात आला. प्रास्ताविक विलास मुंडले यांनी केले. संचालन प्रा. बळीराम भांगे यांनी केले तर प्रा. मंगेश गिरडकर यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सूरज इटनकर, अरविंद हजारे, विशाल देशमुख, सतीश कामडी, राजेश बांदरे, गिरीश लेंडे, कोहिनूर वाघमारे, उमेश वाघमारे, हरिश्चंद्र दहाघाने, किशोर हजारे, उमेश हटवार, लक्ष्मीकांत गिरडकर, केतन रेवतकर, राकेश नौकरकर, विशाल मेहेर, प्रशांत ढोके, अमित लाडेकर, सचिन हिरडकर, प्रफुल्ल बानकर यांनी सहकार्य केले.